स्टोरी

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण.

Spread the love

ओटवणे प्रतिनिधी: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले. सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत गेल्या १५ वर्षांपासून सावंतवाडी तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्या वितरित करण्यात येतात. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या छत्र्यांचे वितरण करण्यात आले.

यावर्षी कोलगाव केंद्र शाळा नं. १, ओटवणे केंद्र शाळा नं. १, सावंतवाडी शहर शाळा नं. ४, दाणोली बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालय, ओटवणे रवळनाथ माध्यमिक विद्यालय, मळगाव इंग्लिश स्कूल, माजगाव भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, सावंतवाडी वि. स. खांडेकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना या छत्र्या वितरित करण्यात आल्या. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. या सर्वांनी सिंधू मित्र प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक करीत आभार मानले.


Spread the love

Related posts

कोल्‍हापूरसारख्‍या ऐतिहासिक शहरात काम करायला मिळाले हे माझे भाग्‍य ! – के. मंजूलक्ष्मी, आयुक्‍त, कोल्‍हापूर

news

ग्रामपंचायत हद्दीतील घर बांधकाम आणि दुरुस्ती अधिकार पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतीला मिळावेत !

news

प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १० व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

news

Leave a Comment