चंद्रपूर (महेश निमसटकर) भद्रावती दि. १५:- विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षकांना शोधत आहेत, “बिलओ” बनून शिक्षक जनगणनेसाठी विदयार्थ्यांच्या पालकांना शोधण्यासाठी येरझारा मारत आहेत,
व नाव नोंदणीसाठी पालकांचे “एसआयआर” अनिवार्य करण्यात
आल्याने बाहेरगावी वसलेले पालक २००२ च्या यादीमध्ये आपल्या पालकांना शोधत आहेत. एकंदरीत विदयार्थी- शिक्षक- पालक यांच्यात
शोधाशोध नावाचा ‘ नॅशनल गेम’ गमंतदार तेवढाच चिंतनीय झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. नव्याने मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्यांना पालकांचा तपशील सादर करण्याचे फमाॅन निवडणूक आयोगाने काढल्याने युवा, युवती व बरीच पालक मंडळी आपल्या पालकांचा भुतकाळ २००२ च्या याद्यांमध्ये शोधत आहे. एका “SIR”
ने सारी शोधाशोध सुरू झाली असून यात मोठी गोची शाशकीय, खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील “सर”लोकांची होत असल्याचे
निदर्शनास येऊ लागले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमून दिलेले काम शिक्षकांना सक्तीचे असल्याने आता जनगणने सोबत मतदार यादयांची
पडताळणी मोहीम एकदमच सुरू करण्यात आल्याने विदयार्थी व शाळा वाऱ्यावर सोडण्याचे पातक शिक्षकांचे हातून यंदा घडणार आहे.
सर्व शाळांमधील अधैअधिक शिक्षक “SIR ” पकडून बसल्याने
उरल्यासुरल्या शिक्षकांच्या जबाबदारी वर वगॅ भरत आहेत. विदयार्थी आपल्या वगॅ शिक्षकांना शोधत आहेत, विदयार्थी शिक्षकांना शोधताना रडकुंडीस येत आहेत. “SIR”च्या मोहीमेवर असलेले ‘सर’ विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान बघून हवालदिल होत. असल्याचे विदारक चित्र आहे. अशा स्थितीत शाळा व्यवस्थापनाचीही मोठी कसरत होताना दिसते. शाशन धोरणानुसार शाळा प़मुख सुद्धा १९४ कामांच्या
ओझाने वाकलेले आहेत ही सत्यता
आहे.
जनगणनेच्या दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सोबतीला आता मतदार
यादयांची पडताळणी शिक्षकांच्या माथी मारण्यात आली आहे. शिक्षकांना बुथ अधिकारी नेमण्यात आले आहे. सत्राची सुरवातच शिक्षकांच्या कमतरतेत झाली, जनगणना, मतदार याद्या पडताळणी व कदाचित येत्या काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांची धुम राहीली तर २०२६ -२७ या सत्रात शिक्षक वविदयार्थी यांचेसाठी सत्र शैक्षणिक होते की अशैक्षणिक हे कळायला
वाव उरणार नसल्याचे बोलले जाते.
देशभरातील ५० टक्के शिक्षक “SIR” मोहिमेवर आहेत. हे एकच काम नाही तर शासनाने शिक्षकांना चालू सत्रात १५ प्रकारच्या अशैक्षणिक कामात जुंपले आहे व तसे आदेश निघाले
आहेत. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने सुद्धा पुढील आदेशापयॅत शिक्षकांना अशैक्षणिक कामात न गुंतवण्यात आदेश दिले आहेत. पण शासन स्तरावर या आदेशाची सराॅस पायमल्ली सुरू असल्याची शोकांतिका आहे. पुढील आदेश जुलै महिन्याअखेर होईल पण शिक्षकांनी हे करावे. अन्यथा घरी बसावे हा शासनाचा आदेश. या धोरणाविरोधात जि. प. शिक्षकांनी एक दिवसीय संप पुकारला होता. पण शिक्षकांची चळवळ शिक्षक संघटनेच्या “वळवळ” करणाऱ्या
नेत्यांपायी कोमात गेल्याची चर्चा आहे.
या सत्रात विद्यार्थी शिक्षकांना शोधत आहेत, शिक्षक शाळेत
कदाचीत दिसतात. शिक्षक जनगणनेसाठी पालकांना शोधत
आहेत, आज- उदया करून पालक शिक्षकांची फिरकी घेताना
दिसतात. आता मतदार नोंदणी करणारे पालक, गाव सोडून बाहेर
वसलेले पालक आपल्या माय-बापांचा गोषवारा शोधण्यासाठी २००२ ची मतदार यादी शोधण्यासाठी वणवण भटकत आहेत व हे वास्तव लपून राहिलेले दिसत नाही. संप पुकारला होता. पणशिक्षकांची चळवळ शिक्षक संघटनेच्या “वळवळ” करणाऱ्यानेत्यांपायी कोमात गेल्याची चर्चा आहे. या सत्रात विद्यार्थी शिक्षकांनाशोधत आहेत, शिक्षक शाळेतकदाचीत दिसतात. शिक्षकजनगणनेसाठी पालकांना शोधतआहेत, आज- उदया करून पालक शिक्षकांची फिरकी घेतानादिसतात. आता मतदार नोंदणीकरणारे पालक, गाव सोडून बाहेरवसलेले पालक आपल्या माय-बापांचा गोषवारा शोधण्यासाठी २००२ ची मतदार यादी शोधण्यासाठी वणवण भटकत आहेत व हे वास्तव लपून राहिलेले दिसत नाही.
