सावंतवाडी (कलंबिस्त) : कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तभध्ये पालक शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अभिजीत जाधव, पालक शिक्षक संघाचे मावळते उपाध्यक्ष श्री. सुभाष राऊळ, सहसचिव श्रीम. समिक्षा नेवगी, कार्यकारणी सदस्या रसिका मेस्त्री,श्रीम. मृणाली कुडतरकर, प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.शरद सावंत आदी उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक, उपस्थितांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक जाधव सर यांनी करुन पालक शिक्षक स्थापनेचा उद्देश व महत्त्व ,शासनाच्या विविध योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, तसेच प्रशालेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. पालक शिक्षक संघाच्या सभांचे इतिवृत्त वाचन व जमा खर्चाचा आढावा पालक शिक्षक संघाचे सचिव श्री विलास चव्हाण सर यांनी घेतला. शालेय वार्षिक परीक्षेतील इयत्ता पाचवी ते नववीतील गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री.किशोर वालावलकर यांनी उपस्थित पालकांना नवीन शैक्षणिक धोरण व बदलता अभ्यासक्रम,विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी पालकांची भूमिका यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२7करिता पालक शिक्षक संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष- श्री.अभिजीत जाधव (मुख्याध्यापक) उपाध्यक्ष- श्रीम. प्रिया दळवी,सचिव- श्री.प्रकाश पावरा(सहाय्यक शिक्षक), सहसचिव-श्री.महादेव मेस्त्री, कार्यकारणी सदस्य- श्री.गजानन पास्ते,श्री.रविंद्र तावडे श्री. अरविंद पास्ते, श्रीम. दीपिका सावंत श्रीम. सिमरन राऊळ, श्री.अनिल मेस्त्री, श्री.देविदास सावंत श्रीम.विनया बिडये, श्रीम.भावना राणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेला कलंबिस्त, वेर्ले,सावरवाड येथील पालक, प्रशालेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन श्री.किशोर वालावलकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.विलास चव्हाण यांनी केले.
