क्राईम

नवी मुंबई येथील अपर जिल्हाधिकारी रामदास जगताप ACB च्या ताब्यात.

Spread the love

नवी मुंबई: नवी मुंबई येथे अपर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले डिजिटल ७/१२ चे जनक अशी ओळख असलेले रामदास जगताप यांना ACB प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. कथित लाच प्रकरण आणि आर्थिक व्यवहारांच्या चौकशीदरम्यान ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महसूल विभागात डिजिटल ७/१२ प्रणाली राबवण्यात अपर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांचे मोठे योगदान आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. नवी मुंबईतील सिडकोचे (CIDCO) भूमी व भूमापन अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप (वय ५७) यांना २२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने१३ मे २०२६ रोजी ही कारवाई केली आहे. सिडकोच्या साडेबावीस टक्के योजनेतील जमिनीच्या करारासाठी त्यांनी लाच मागितली होती. नवी मुंबई एसीबीच्या पथकाने त्यांना सिडको कार्यालयात रंगेहाथ पकडले आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे परिमंडळाचे पोलीस अधिक्षक पदी शिवराज पाटील यांनी नगरविकास विभागाच्या खात्याच्या अखत्यारीत येणा-या नवी मुंबई महापालिका, सिडको मंडळ यांमधील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात उघडकीस आणले आहेत. सिडकोचा पोलीस अधिक्षक पदी शिवराज पाटील यांनी आठवा भ्रष्ट कारभार उघडकीस आणला आहे. लाच घेणे हा गुन्हाच आहे. सामान्य नागरिक सिडकोच्या कारभाराविषयी तक्रारी सिडकोच्या दक्षता विभागाकडे करू शकतात. अजूनही जनजागृती वाढविणे गरजेचे आहे. असे आवाहन त्यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

हमासच्या दहशतवाद्यांनी केली ४० लहान मुलांची हत्या….

news

आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फसवणूकप्रकरणी क्लास मॅनेजरला अटक!

news

केरळच नाही, तर इतर राज्यांतही हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला बळी पडत असल्याचे उघड!

news

Leave a Comment