स्टोरी

हवामान कूल कृषी प्रशिक्षण कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: कृषी विभाग, UNDP व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदव्हाळ येथे एकदिवसीय हवामान कूल कृषी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत व हवामान कूल शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी मालवण श्री. हुसेन आबर्डेकर, श्री. धनंजय गावडे, श्री. सावंत सर, UNDP जिल्हा समन्वयक श्री. रोहित सावंत, दिलासा जिल्हा समन्वयक श्री. सुरज गगनग्रास तसेच पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी श्री. नवनाथ शिंदे, श्री. शुभम कुरुंदवाडकर व श्री. अविनाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी GCF-ECRICC टीममार्फत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

देवगड येथील PA Agriculture सौ. दीपिका रावराणे यांनी GCF-ECRICC प्रकल्प तसेच फार्मर कप स्पर्धेविषयी सविस्तर माहिती दिली. पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी श्री. अविनाश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर मार्गदर्शन केले, तर श्री. शुभम कुरुंदवाडकर यांनी “समृद्धीची सीडी” या संकल्पनेविषयी माहिती दिली.UNDP चे राज्य समन्वयक श्री. विक्रम यादव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकारी व शेतकऱ्यांशी संवाद साधत हवामान कूल शेतीचे महत्त्व विशद केले.दुपारच्या सत्रात फार्मर कप स्पर्धेचे मूल्यांकन व शेतकरी सहभाग या विषयांवर श्री. शुभम कुरुंदवाडकर व श्री. नवनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विभागाचे श्री. कदम साहेब तसेच UNDP-DILASA चे सलीम तांबोळी, हिमांशू कदम, नेहा पवार, दीपिका रावराणे व शुभम सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.


Spread the love

Related posts

झारापमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धा संपन्न.

news

कोमसापच्या २२ मार्च रोजी होणाऱ्या संमेलनाची नियोजन आढावा बैठक संपन्न.

news

राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याचे काम ९० टक्के पूर्ण ! आमदार नितेश राणे

news

Leave a Comment