क्राईम

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ अंतर्गत वैभव सोनावणेवर वेंगुर्ले पोलीसांत गुन्हा दाखल

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सागर कवच बंदोबस्तावेळी होडावडा क्षेत्रपालेश्वर तिठा येथे थांबुन वेंगुर्लेकडे येणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना तळवडे दिशेकडुन वेंगुर्लेस येत असलेल्या एक इनोव्हा चार चाकी वाहनाच्या तपासणीत गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी ठाणे-कल्याण येथील वैभव रघुनाथ सोनावणे याच्यावर वेंगुर्ले पोलीसांत महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) अंतर्गत वैभव सोनावणे याचेवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच इनोव्हा गाडीसह २२ लाख, १० हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांना जप्त केला आहे.
सागर कवच बंदोबस्तावेळी होडावडा क्षेत्रपालेश्वर तिठा येथे पोलीस निरीक्षक अतुल जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर कांडर, परशुराम उर्फ बंटी सावंत, विठ्ठल उर्फ बंड्या धुरी, सखाराम परब हे वेंगुर्लेकडे येणाऱ्या गाड्यांची तपासणी करीत असताना दुपारी २.४० वाजण्याच्या सुमारांस एम.एच.-०५-एफ.जी.-१०१० हि इनोव्हा कार आली असता तिची तपासणी या पथकाने केली. या तपासणी गाडीच्या डीकीत गोवा बनावटीच्या तीन प्रकारची नावे असलेल्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. वेंगुर्ले पोलीसांत महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) अंतर्गत वैभव सोनावणे याचेवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच इनोव्हा गाडीसह २२ लाख १० हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांना ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बंड्या धुरी करीत आहेत.


Spread the love

Related posts

वागदे येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.

news

चिंचपाडा गावात अज्ञात इसमाने पेटवून दिल्या ३ टू व्हीलर आणि १ कोर व्हिलर अशा एकूण ४ गाड्या!

news

मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदु विद्यार्थिनींची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून त्यांना धमकावले !

news

Leave a Comment