स्टोरी

आदर्श विद्या मंदिर संस्थेतील गैरव्यवहाराविरोधात १६ जुलैपासून ‘दुर्गा शक्ती’चे आमरण उपोषण..!​

Spread the love

बदलापूर: ​बदलापूर (पूर्व) येथील ‘आदर्श विद्या मंदिर’ संस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार, कारभारातील अनैतिकता आणि वादग्रस्त संचालक मंडळाच्या राजीनाम्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय बजरंग दल’ प्रणित ‘दुर्गा शक्ती‘ संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे. वारंवार मागण्या करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले न उचलल्याने “अखेर आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे,” असा इशारा देत येत्या गुरुवार, दिनांक १६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ‘अन्नत्याग आमरण उपोषण’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दुर्गा शक्तीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा कु. ज्योती राजेश जवळेकर यांनी दिली.​या संदर्भात संघटनेने २४ जून आणि ९ जुलै रोजी शाळा प्रशासनाला लेखी पूर्वसूचना देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र, पुरेसा वेळ देऊनही प्रशासनाने या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी हे पाऊल उचलणे भाग पडले आहे. हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण व सनदशीर मार्गाने केले जाणार असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार कु. ज्योती जवळेकर यांनी व्यक्त केला आहे.​तरी या जनहितार्थ आणि शैक्षणिक क्षेत्रातील अन्यायाविरोधातील आंदोलनाला आपल्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी द्यावी, ही विनंती.​आपले नम्र,श्री दिनेश पाटील संस्थापक, अध्यक्ष अखिल आर्यवत अंतराष्ट्री बजरंग दल.कु. ज्योती राजेश जवळेकरठाणे जिल्हा अध्यक्ष, दुर्गा शक्ती(आंतरराष्ट्रीय बजरंग दल)


Spread the love

Related posts

मुणगे तिठा येथे ३० रोजी ‘अघोर लक्ष्मी’ नाट्यप्रयोग!

news

कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी!

news

मंत्रालय आणि विधीमंडळ पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण!

news

Leave a Comment