स्टोरी

शिक्षण मंत्री श्री.दादा भुसे साहेब यांच्या समवेत प्राथमिक शिक्षक संघटनाच्या समस्यांबाबत बैठक

Spread the love

म. ला. देसाई✍🏻: महाराष्ट्र राज्यातील शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींच्या शैक्षणिक समस्या सुटाव्यात म्हणून ९ जुलै २०२६ रोजी आझाद मैदानावर आंदोलन झाले होते. आंदोलन कर्त्या कार्य शिक्षकांच्या मागण्या पूर्ण भागात म्हणून आज शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या दालनामध्ये बैठक झाली, या बैठकीमध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विक्रम काळे, आमदार श्री सुधाकर आडबले, व अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.

२) प्राथमिक शाळेतील आज पर्यंत टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना सेवा जेष्ठता यादी मध्ये घेऊन प्रमोशन द्यावे.

२) राज्यातील अनेक शिक्षकांना Blo च्या ड्युट्या लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, ड्युटी रद्द कराव्या याकरता चर्चा करण्यात आली, या संदर्भात पुढील आठवड्यात महसूल विभाग व शिक्षण विभाग त्यांचे संयुक्त बैठक आयोजित करून तोडगा काढाव्याचे ठरले.

३) महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना टीईटी करणे अनिवार्य असल्यास , कार्यरत शिक्षकांची स्वतंत्र परीक्षा घ्यावी, अन्य राज्यांनी यावर काय उपाययोजना केली आहे त्याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल.

४) सहावी ते आठवीच्या सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे.

५) Blo ड्युटी नाकारणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, ते गुन्हे मागील घ्या मागे घ्यावेत, महसूल विभागाच्या बैठकीत चर्चा करून मार्ग काढला जाईल

६) नऊ जुलै 2026 रोजी शाळा बंद आंदोलन केले होते त्याचा पगार न कापता, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शनिवारी जादा तास थांबून बुडलेल्या दिवस भरून काढला जाईल. अशी मागणी केली.

मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय केला जाईल इत्यादी विषयांवर चर्चा केली. बैठक उशिरा सुरू झाल्याने निवेदन प्राप्त विषयांवर चर्चा करण्यात आली. अनुदान त्रुटी पूर्तता, शेवटच्या वर्गाची, पटसंख्या, व आमदार महोदयांकडून प्राप्त झालेले निवेदनानुसार उर्वरित विषयांवर पुढील आठवड्यांमध्ये बैठक घेण्यात येई, बैठकीसाठी शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे प्रशांत भामरे, निर्भय म्हात्रे, बबन पाटील भाजप-शिक्षक सेल चे विकास पाटील सर, एन एम भामरे सर, शिक्षक सेनेचे चिंतामण वेखंडे, शिवाजी शेंडगे, जालिंदर सरोदे, रामनाथ इथापे, सुदर्शन ताई, कृती समितीचे खंडेराव जगदाळे, संजय डावरे, सुभाष पवार, शिक्षक परिषदेचे , राजेश सुर्वे, आखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे श्री विनोद जोशी सर, वराज्य संयुक्त चिटणीस श्रीकृष्ण चिकने सर कास्टट्रइब संघटनेचे विजय जाधव, बिपिन साळवे, व अन्य संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Related posts

अधिवक्‍ते गुणरत्न सदावर्ते यांची सनद २ वर्षांसाठी रद्द!

news

कै. प्रा. काका दामले यांनी आपल्या आयुष्यात शिक्षणाबरोबरच कष्टालाही महत्त्व दिले! वामन कविटकर

news

क्रीडा संकुलचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी येत्या दि. १५ ऑगस्ट दिवशी आमरण उपोषण करणार! शीतल राऊळ

news

Leave a Comment