संपादकीय✍🏻: सावंतवाडी तालुक्यातील एक मुस्लिम व्यक्ती व कॅथलिक महिला फिल्मी दुनियेची स्वप्ने दाखवून हिंदू धर्मातील काही महिला व मुलींना धर्मांतराच्या वाटेवर नेत असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. संबंधित मुस्लिम व्यक्ती व कॅथलिक महिला या जिल्ह्यात रिल्स बनवण्याचे काम करतात. मुस्लिम व्यक्ती हा मुंबई फिल्म इंडस्ट्रिमध्ये स्वतःच्या खूप ओळखी असून चित्रपट, सिरीयलमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलांना झाळ्यात ओढत असल्याची माहिती मिळत आहे. फिल्मी दुनियेचे आणि महागड्या लाईफची आवड असणाऱ्या काही तरुणी आणि महिला या लोकांच्या अमिषाला बळी पडत आहेत. अशी माहिती मिळत आहे. महत्वाचे म्हणजे हिंदू धर्मातील काही महिला आणि पुरुष ज्यांना अभिनयाचे आणि प्रसिद्धीचे वेड लागले आहे. त्यांचा वापर करून हा मुस्लिम व्यक्ती इतर तरुणी मुलींना आणि महिलांना स्वतःच्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी होत आहे.
एक स्वतःला रिल्स स्टार आणि जगभरात प्रसिद्ध समजणारी महिला या विकृत प्रवृत्तीच्या लोकांना स्वतःच्या स्वार्थासाठी मदत करत आहे. हि माहिला या लोकांच्या सतत संपर्कात असून त्यांच्या घरात राहणे, एकत्र जेवण करणे असे अनेक पुरावे मिळत आहेत. त्यानंतर हिच महिला हिंदू धर्मातील विविध कार्यक्रमात हजर राहून, कार्यक्रमांच्या रिल्स बनवून इतर तरुण मुलींना आणि महिलांना आकर्षित करत आहे. साहजिकच या महिलेची लक्झरी लाईफ अर्थात उत्कृष्ट जीवनशैली बघून काही गरीब मुली, महिला ह्यारिल्स काढणाऱ्या महिलेच्या आहारी जात आहेत. पुढे जाऊन या मुली, महिला साहजिकच लव्ह जिहाद किंवा धर्मांतर सारख्या मोठ्या समस्यांना बळी पडण्याची शक्यता आहे. हे नाकारता येणार नाही. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक वरिष्ठ नागरिक जो स्वतःला कवी म्हणतो किंवा विचारवंत म्हणतो आणि हिंदू धर्माच्या सनातन कार्यक्रमांमध्ये उपस्थित असतो, तोही ह्या विकृत प्रवृत्तीच्या मुस्लिम व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा वरिष्ठ व्यक्ती हिंदू सनातनद्वारे आयोजित लव्ह जिहाद विषयीच्या मार्गदर्शन कार्यक्रमात उपस्थित राहतो आणि त्यानंतर लगेच काही दिवसात याच मुस्लिम व्यक्तीच्या घरात विविध कार्यक्रमांसाठी ही उपस्थित राहतो. तसेच त्याच्यासोबत रिल्स हि काढतो. त्यामुळे हा वरिष्ठ नागरिक जो स्वतःला कवी किंवा कलाकार समजतो तो व्यक्ती सुद्धा ह्या चुकीचं काम करणाऱ्या मुस्लिम व्यक्तींसाठी काम करत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. आणि खरंच असं असेल तर हे खूप धक्कादायक आणि हिंदू समाजातील मुलींना धोकादायक आहे. किरकोळ पैशांसाठी आणि किरकोळ प्रसिद्धीसाठी आपल्याच हिंदू धर्मातील काही व्यक्ती काही महिला अशा लोकांना साथ देत आपल्याच धर्माची विटंबना करत आहेत. हे नाकारता येणार नाही.
एकंदरीत सर्व परिस्थिती लक्षात घेता आपल्या धर्मातील हिंदू धर्मातील पालकांनी आपल्या मुली कोणासोबत आहेत? कुठे जातात? आणि काय करतात? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या जिल्ह्यातील काही व्यवसायिक दुकानांच्या, आपल्या व्यवसायाच्या जाहिराती देऊन त्यांना आणखी प्रसिद्धी देत आहेत. कळत नकळत अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. त्यामुळे या लोकांची प्रसिद्धी वाढत आहे आणि या लोकांना धर्मांतरासारखी प्रकरणे करण्यासाठी आणखीन प्रेरणा मिळत आहे. त्यातूनही समाजाला धोका निर्माण होत आहे. हे नाकारता येणार नाही. त्यामुळे अशा विकृत आणि आपल्या हिंदू धर्माला धोकादायक ठरणाऱ्या लोकांना व्यवसायिक रिल्स बनवण्यासाठी बोलवणे, त्यांना पैसे देणे म्हणजे धर्माच्या विरोधात काम करणं असंच म्हणता येईल. त्यामुळे काही व्यवसायिकांनी सुद्धा अशा रिल्स बनवणाऱ्या काही विकृत प्रवृत्तीच्या महिला आणि पुरुष यांना ओळखून त्यांना काम देणे बंद करणे हि काळाची गरज आहे. नाहीतर कळत नकळत का होईना पण आपणच आपल्या हिंदू धर्माच्या विरोधात काम करणाऱ्या महिलांना आणि पुरुषांना आर्थिक पाठबळ देत आहोत. हे नाकारता येणार नाही. त्यामुळे सार्वजनिक हिंदू मंदिरे, मठ कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांनी या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. कार्यक्रमात येणाऱ्या महिला, येणारे पुरुष या कोणत्या ठिकाणी वावरत आहेत? याबाबत योग्य ती माहिती घेऊनच त्यांना पुढे योग्य ते स्थान देणे गरजेचे आहे.
याच मुस्लिम व्यक्तीने हिंदू धर्मातील एका मुलीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न करून त्यानंतर तिला एक दाम्पत्य झाल्यानंतर तिला घटस्फोट दिलेला आहे. त्यानंतर या व्यक्तीने पुन्हा स्वतःचा मुस्लिम धर्म सोडून दुसऱ्या धर्मातील महिलेशी लग्न केले. हे माहिती असून सुद्धा आपल्या हिंदू धर्मातील काही महिला या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचतात, त्याच्या घरात राहतात, घरात जेवतात आणि ह्याच्या ग्रुपमध्ये राहून व्यवसायिक रिल्स बनवतात आणि आपल्या हिंदू धर्माच्या विरोधात कळत नकळत का असेना काम करत आहेत. हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे साहजिकच आपल्या हिंदू धर्मातील वयात येणाऱ्या मुलींकडे पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा पुढे जाऊन बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.
संबंधित लेख हा कोणत्याही धर्माच्या लोकांचे मन दुखवण्यासाठी लिहिलेला नसून हिंदू धर्मातील मुलींना चुकीच्या मार्गावर नेणाऱ्या हिंदू धर्मातील काही महिला, काही पुरुष आणि मुस्लिम धर्मातील जिहादी पुरुषां बाबत आहे. त्यामुळे कळत नकळत चुकीचे शब्द आढळून आल्यास त्याबाबत क्षमा असावी. तसेच कोणत्याही धर्माबाबत चुकीचं बोलणं किंवा चुकीचं कृत्य करणं हे माझे ध्येय नसून चुकीच्या वळणावर जाणाऱ्या आपल्या हिंदू धर्मातील मुलींना पालकांनी योग्य वेळीच सावध करावे आणि पालकांनी स्वतः सावध व्हावे. हा यामागील उद्देश आहे.
