क्राईमराजकारण

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा!पुसेसावळीतील तरुणाचा मृतदेह 13 तासांनंतर नातेवाईकांनी ताब्यात.

Spread the love

पुसेसावळी, ता. खटाव येथे संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यात एका मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह 13 तासांनंतर नातेवाईकांनी ताब्यात घेतला आहे. जोपर्यंत मुख्य सूत्रधाराला अटक केली जात नाही,  तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली गेली होती.

तसेच, त्या घटनेनंतर साताऱ्यात अनेक संघटना आक्रमक झाल्या त्याच वेळी त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा तसेच भाजपचे प्रदेश उपाध्‍यक्ष विक्रम पावसकरांना  वेळीच अटक करावी अशी मागणी केली आहे.

तसेच जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या प्रस्तुतीकारणात यावेळी असे म्हटले आहे की, रविवार दि. 10 रोजी पुसेसावळी मध्ये रात्री काही समाजकंटकांनी जो हल्ला केला त्यात एकाचा मृत्यू झाला, आणि दहा जण गंभीर जखमी झाले. तसेच दुकाने व इमारती जाळन्यात आले आहे. मागील तीन महिन्यांत झालेल्या वेगवेगळ्या घटनानं बद्दल पोलिसांनी वेळीच हल्लेखोरांनावर कारवाई केली नसल्याने हा हल्ला झाला आहे.

या घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्याच्या प्रतिमेला तडा गेला. तसेच या झालेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी घेऊन गृहखाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, असे निवेदनात ठाम म्हटले गेले आहे.


Spread the love

Related posts

संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी तर मंदार केणी यांची जिल्हा प्रवक्ते पदी नेमणूक

news

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राहुल गांधी यांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान

news

शरद पवार यांचीं घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार

news

Leave a Comment