स्टोरी

श्री क्षेत्र खोटले येथे ८ ऑगस्ट रोजी स्वामीसुत महाराज पादुका दर्शन सोहळा!

Spread the love

खोटले प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थहा दशाक्षरी मंत्र, तसेच स्वामी समर्थ यांचे दोन हजाराहून अभंग रचना, स्वामी पाठ स्वामी आरती निर्माते तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अनेक शिष्यपैकी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी आपला मुलगा मानला त्या स्वामी सुत महाराज यांच्या पादुकांचे दर्शन, 160 वर्षात प्रथमच, श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले येथे भाविकांना होणार आहे. श्री स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठ, चेंबूर येथून स्वामीसुत महाराज यांच्या पादुका कोकणात प्रथमच 160 वर्षानी येत आहेत.शनिवार 8 ऑगस्ट रोजी,संध्या. 5:30 वा. स्वामीसुत महाराज यांच्या पादुका श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले येथे आगमन होणार आहे.या वेळी विविध कार्यक्रम आयोजन उत्सव समिती यांनी केले आहे.श्री क्षेत्र खोटले येथे 6 वा आगमन होईल.श्री स्वामी समर्थ मठात पाद्य पूजन होईल.भाविकांना पादुका दर्शन 7 ते रात्री 9:30 पर्यन्त होणार आहे. याच वेळी श्रद्धास्थान महाप्रसाद मंडप चा स्वामी समर्पण सोहळा भारतीय साधू संत आखाडा अध्यक्ष महंत श्री मौनी महाराज, नागपूर यांच्या शुभ हस्ते होणार आहेत. या वेळी प्रमुख उपस्थिती स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठ, मुंबापुरी गादी चे मठाधीश श्री. विजय नलावडे तसेच चुनवरे गावचे स्वामी भक्त श्री. प्रल्हाद रामचंद्र परब यांची असणार आहे. संध्याकाळी 7 ते 8 भजनसंध्या संगीत विशारद श्री सुंदर मेस्त्री, रात्री 8 ते 9:30 महाप्रसाद, रात्री 9:30 वा. पादुका प्रस्थान होणार आहे.सुमारे 160 वर्षांनी हा सुवर्ण योग आहे.स्वामीभक्त यांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने गणेश घाडीगावकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

“शंभो जय जय श्री रवळनाथ” या व्हिडिओ भक्तिगीताच्या प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न….!

news

सिंधुदुर्ग मधील माकडांची होणार प्रगणना, सावंतवाडी वन विभागाकडून माकड उपाययोजनेचे पुढचे पाऊल…..!

news

५ ऑगस्‍टला शरद पोंक्षे राजकीय विश्‍लेषकांची मुलाखत घेणार !

news

Leave a Comment