स्टोरी

वडाचापाट येथे ७ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन!

Spread the love

​ मसुरे प्रतिनिधी: कोंकण कॅन्सर अ‍ॅण्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, वडाचापाट ग्रामपंचायत आणि उद्योजक श्री. दयानंद प्रभुदेसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ७ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर वडाचापाट ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत पार पडणार आहे.​या शिबिरामध्ये प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर डॉ. आदेश पालयेकर (M.S., M.Ch.-Surg. Oncology, Consultant Surgical Oncologist) आणि डॉ. गायत्री पालयेकर (M.B.B.S., DGO, DNB, FRM, Laparoscopic Surgeon, IVF Specialist) रुग्णांची मोफत तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी विविध प्रकारच्या कॅन्सरची तपासणी व निदान, तसेच सर्व प्रकारच्या गाठींची तपासणी.​ स्त्रियांच्या सर्व आजारांची तपासणी, गर्भाशय व गर्भाशयातील गाठी, प्रजनक्षमता वाढवणे, प्रसूतीपूर्व तपासण्या आणि कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन. सर्व प्रकारचे हर्निया, हायड्रोसील, अपेंडिक्स, पोटाच्या आतड्यांच्या तपासण्या, मुत्रविकार व किडनी तपासणी, प्रोलॅप्स सर्जरी निदान, किमोथेरपी व जनरल तपासणी.अतिजोखमीच्या व लहान-मोठ्या शस्त्रक्रियांबद्दल मोफत माहिती व मार्गदर्शन.​शिबिराच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या प्राथमिक तपासण्या व शस्त्रक्रियांसंदर्भात आवश्यक माहिती दिली जाईल.​शिबिराच्या ठिकाणी कोणतीही शस्त्रक्रिया होणार नाही, याची नोंद घ्यावी.​या मोफत आरोग्य शिबिराचा वडाचापाट आणि आजुबाजूच्या सर्व गावांतील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई, उपसरपंच श्री. सचिन पाताडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग देवगड येथे अॅलहव रिले जातीचे महाकाय समुद्र कासव सापडले !

news

कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त १० वी बॅच १९९३-९४ चा स्नेहसंमेलन सोहळा अविस्मरणीय ठरला.

news

विलवडे गावचे सुपुत्र श्री. सुभाष दळवी यांचीमहाराष्ट्र राज्याच्या समन्वयकपदी नियुक्ती

news

Leave a Comment