मसुरे प्रतिनिधी: हरितक्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रासाठी मोठे योगदान आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक आहे.बदलत्या वातावरणाचा शेतीवर परिणाम होऊ नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरा. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी जील्हा परिषद व पंचायत समिती मधून जास्तीत जास्त योजना राबविण्यावर सातत्याने आग्रही असतात. शेतकरी राजा हा महत्वाचा घटक आहे. मालवण तालुक्यासाठी जास्तीचा निधी कृषी विभागाला देण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे प्रतिपादन जि. प. वित्त व बांधकाम सभापती संतोष साटवीलकर यानी पळसंब येथे केले. पंचायत समिती मालवण, तालुका कृषी कार्यालय मालवण आणि पळसंब ग्रामपंचायत यांच्या वतीने कृषी दिन शेतकरी मेळावा प्राथमिक शाळा पळसंब येथे बुधवारी आयोजित करण्यात आला होता.यावेळी व्यासपीठावर सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण, उप सभापती घनशाम झाड, गटविकास अधिकारी सौ परागिणी पाटील, तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव, सहा. गटविकास अधिकारी पी. आर. सावंत, जि प सदस्या क्षमा हडकर, प स सदस्य दीपक सुर्वे, गणेश तोंडवळकर, योजना कांबळी, दीपक चव्हाण, मानसी भोगावकर, सीमा परुळेकर, पशुधन अधिकारी सुधीर कानसे, किर्लोस विज्ञान केंद्राचे विकास धामापूरकर, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, विस्तार अधिकारी व्हि. के. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

वृक्ष दिंडीने कार्यक्रमाचा प्रारंभ नाखरे यांच्या निवासस्थानी गो-पूजन, हळद लागवड यंत्रसामुग्री लोकार्पण व विधिवत पूजा, हळद लागवड प्रात्यक्षिक, वृक्ष दिंडी मध्ये जि.प. शाळा व हायस्कूल विद्यार्थी सहभागी झाले होते. सभापती प्रज्ञा चव्हाण यानी शुभेच्छा देताना पुढील काळात सेंद्रिय शेती करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी एकतरी गोमाता पाळावी. पंचायत समिती स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य शेतकऱ्यांना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव म्हणाले, शेती मध्ये क्रांतिकारक बदल माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यानी केला. आता शेती पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी आपल्या शंका कृषी कर्मचाऱ्यांना कडून माहिती घेऊन दूर कराव्यात. तसेच शासकीय विविध योजनाची माहिती दिली. किर्लोस कृषी विद्यालयाचे विकास धामापूरकर यानी आधुनिक शेतीसाठी मातिपरीक्षण, बांध बदीस्ती, सेंद्रिय शेती याबाबत मार्गदर्शन केले. नवीन पिढी सदृढ व्हावी यासाठी हायब्रीड धान्य कमीत कमी वापरा असे आवाहन केले.पशुधन अधिकारी सुधीर कानसे यानी अझोला वनस्पती भातशेती मध्ये वापरून उत्पन्न वाढवा. दूध उत्पादकता वाढण्यासाठी अझोला महत्वाचे आहे. देशी जनावरे जपा असा सल्ला दिला.प स कृषी विस्तार अधिकारी व्ही के जाधव यानी पळसंब येथे १हजार किलो हळद कंद उपलब्ध केल्या बद्दल ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे आभार मानले. कृषी सेवक विवेक रंगे यानी अल निनो बाबत तर शेतकरी प्रमोद सावंत यानी सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन केले.मान्यवरानी शुभेच्छा दिल्या.
शेतकऱ्यांचा सन्मान यावेळी भात पिक स्पर्धा प्रथम तिन क्रमांक विजेते शेतकरी संतोष परब (श्रावण), उल्हास पाटकर (पराड), श्यामसुंदर परब (असगणी ) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर पंचायत समिती पुरस्कार आदर्श शेतकरी श्रीमती रतिका विजय गोलतकर यांना सन्मानित करण्यात आले. बायोगॅस सेंद्रिय खत कार्यक्रमासाठी श्रावण ग्रामपंचायत अधिकारी सुनील प्रभूदेसाई, देऊळवाडा ग्राम. अधिकारी प्रकाश सुतार, काळसे ग्राम. अधिकारी अर्पिता शेलटकर यांना गौरविण्यात आले. तर मनरेगा उत्कृष्ट कामगिरीसाठी चिंदर ग्राम.चे दिगंबर जाधव, नंदादीप दळवी (तळगाव), रामकृष्ण नाईक ( गोळवण), सतीश कांबळी (खरारे पेंडूर) यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी विस्तार अधिकारी श्री. हांडे, ए. एम. परब, सुधीर गायकवाड, श्रीमती खोबरेकर, उपसरपंच अविराज परब, पो पाटील पूनम गोलतकर, ग्रामपंचायत अधिकारी माधुरी कामतेकर, अर्पिता शेलटकर, अमित कांबळी, विनोद रावले, प्रकाश सुतार, सुनिल प्रभुदेसाई, युवराज चव्हाण, विशाल लोखंडे, लक्ष्मण सरमळकर, श्री मगम, श्री जोशी, सचिन चव्हाण, श्रीमती कांबळे, मंडळ कृषि अधिकारी दशरथ सावंत,सिताराम परब, संचिता फाळके, राणी थोरात, सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, कृषी सेवक व आत्मा कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.प्रास्ताविक गटविकास अधिकारी परागिणी पाटील यानी करताना हा तालुका कृषी क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी आपले प्रयत्न असतील असा विश्वास दिला. कृषी दिन शेतकरी मेळाव्याचे चांगल्या प्रकारे नियोजन केल्या बद्दल सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे कौतुक करत सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन आणि आभार मंडळ कृषी अधिकारी श्रीपाद चव्हाण यांनी मानले.
