स्टोरी

महा आवास अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल ग्रामपंचायत बोर्डवे यांना मानाचा पुरस्कार प्रदान.

Spread the love

मसुरे |प्रतिनिधी: केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महा आवास अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल ग्रामपंचायत बोर्डवे यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.ग्रामविकासाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण व परिणामकारक कामगिरी करत बोर्डवे ग्रामपंचायतीने कोकण विभागात आपला ठसा उमटवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल ओसरगाव नंबर 1 शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंचांचा सत्कार केला.

यावेळी सरपंच श्रीमती वेदांगी पाताडे, उपसरपंच श्री अक्षय शिंदे, सदस्य श्री महावीर साळवी, पोलिस पाटील, ग्रामस्थ श्री प्रकाश पेडणेकर, श्री शरद साळवी, श्री मंगेश बागवे तसेच ग्रामपंचायत अधिकारी श्री दत्तात्रय तळवडेकर उपस्थित होते.दरम्यान, या पुरस्कारामध्ये माजी सरपंच श्री राजेंद्र मोडक, ग्रामपंचायत अधिकारी श्री दयानंद गंगावणे व ग्रामपंचायत कर्मचारी यांचेही मोलाचे योगदान असल्याचे सरपंचांनी नमूद केले. “हे यश केवळ एका व्यक्तीचे नसून संपूर्ण गावाच्या एकजुटीचे फलित आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.या गौरवामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामपंचायत बोर्डवेच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत आहे. भविष्यातही ग्रामविकासासाठी अशीच प्रगतीशील वाटचाल सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Spread the love

Related posts

कोमसाप सावंतवाडी शाखा तर्फे लवकरच जिल्हास्तरीय साहित्य संमेलन होणार….

news

नगाव एज्युकेशन सोसायटीच्या अहंकारी संस्थाचालकांमुळे शाळेतील कर्मचाऱ्यांचा होतोय आर्थिक व मानसिक छळ…! सेवानिवृत मुख्याध्यापाक संप्रति बळसाणे 

news

केंद्रीय सुरक्षा दलातील जवानांना सोशल मीडिया वापराबाबत नवे निर्देश जारी!

news

Leave a Comment