स्टोरी

मसुरे देऊळवाडा येथे शोभायात्रा..!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मसुरे देऊळवाडा येथे समाजसेविका सौ. वर्षाराणी बळवंत अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखालीआणि मसुरे देऊळवाडा येथील महिला ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यातून नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुरुवारी स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात या मिरवणुकीने शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. मसुरे येथील श्री दत्त मंदिर श्री देव रवळनाथ मंदिर श्री देव वेताळ मंदिर ते श्री देव भरतेश्वर मंदिर पासून श्री देवी माऊली मंदिर देऊळवाडा येथे या फेरीचे समाप्ती करण्यात आली. प्रत्येक देवतेला नारळ आणि गोड पदार्थ ठेवून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी आकर्षक चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

यामध्ये राम लक्ष्मण सीता असा देखावा सुद्धा सर्वांना मोहित करून गेला.याच्या संयोजिका सौ वर्षाराणी बळवंत अभ्यंकर म्हणाल्या की हे यात्रेचे चौथे वर्ष होते गुढीपाडवा आणि हिंदू नव वर्षाच्या निमित्ताने नेहमीच्या प्रापंचिक व्यस्थतेतून गावातील महिलांना थोडे आनंदाचे क्षण अनुभवता यावेत , सामाजिक सलोखा सौख्य ऐक्य वाढाव,शिवाय आपली नितिमूल्य संस्कार मूल्य जपली जावीत .. यातूनच लहान मुलांवरही नकळत संस्कार व्हावेत ..भावी पिढीला हे सगळं समजावं उमजावं व पुढेही हा वारसा जतनं व्हावा या उदात्त हेतूने या उपक्रम सुरु आहे.यावेळी मसुरे येथील ग्रामस्थ महिला भगिनी लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती.


Spread the love

Related posts

हडी येथे ५ रोजी ‘एक डाव भुताचा’ नाट्यप्रयोग.

news

सावंतवाडी तालुक्यातील शाळांमध्ये ‘चला समजावून घेऊया बापू साहेब महाराज’ उपक्रमाचे आयोजन.

news

देशातील एआयमध्ये अग्रेसर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरक्षेचा कणा सीसीटिव्ही यंत्रणा ठप्प.

प्रसाद परब

Leave a Comment