शिक्षण

शिक्षक भारती आंदोलनाचा प्रभाव; वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव अखेर मंजूर.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेले शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती अध्यक्ष संतोष पाताडे यानी दिली आहे.शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक भारतीने गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. निवेदने, बैठका तसेच आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सातत्याने मांडण्यात आले. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेने उभारलेला लढा अखेर यशस्वी ठरला.वरिष्ठ वेतन श्रेणीचे अगाऊ वेतन वाढ ६९, मुख्याध्यापक ३१ , उपशिक्षक ८५ व पदवीधर ६३ असे २४८ प्रस्ताव मंजूर झाल्याने अनेक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.या यशाबद्दल शिक्षक भारतीच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल तसेच शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांच्या ठाम पाठपुराव्यामुळे आणि सकारात्मक भूमिकेमुळे हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.


Spread the love

Related posts

शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने कलंबिस्त येथील गणशेळवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

news

जि. प. शाळा फणसखोल येथे शिक्षक कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा प्रश्न वाऱ्यावर!

news

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण नूतन कार्यकारणी जाहीर.

प्रसाद परब

Leave a Comment