Uncategorized

आत्तार सरांच्या संशोधक वृत्तीचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा! विजयकुमार कदम.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: आत्तार सरांनी संगणकीय क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली. त्यांची संशोधनाची वृत्ती खूप उच्च पातळीवर आहे. त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग शिरगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मिळाला. त्यांनी ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे केले. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे ते शिक्षकीय पेशामधून जरी ते सेवानिवृत्त झाले असले तरी या संस्थेचे ते कायम अविभाज्य घटक असतील असे प्रतिपादन शिरगाव हायस्कुल शाळा समिती चेअरमन तथा माजी प्राचार्य विजयकुमार कदम यांनी केले.शिरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक शमशुद्दीन आत्तार सर ३४ वर्ष ११ महिन्याचा सेवाकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. शिरगाव हायस्कुल येथे त्यांच्या सेवानिवृत्तीपर कार्यक्रमप्रसंगी माजी प्राचार्य विजयकुमार कदम बोलत होते.

मानद अधीक्षक संदीप साटम, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, वरिष्ठ महाविद्यालयाचे मानद अधीक्षक सुधीर साटम, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिलीप पाळेकर, ज्येष्ठ बालनाट्य दिग्दर्शक डॉ. राजेंद्र चव्हाण, डॉ. राजेंद्र पारकर, गणेश साळगावकर, विठोबा लब्दे, चंद्रशेखर आचरेकर, पेंढरी हायस्कूलचे मुख्याध्यापक सत्यपाल लाडगावकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र वाळके, कोळोशी हडपिड हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक डी.बी. करडे, ताजुनबी आत्तार, नाझनीन आत्तार, सलीम आत्तार, हिदायन आत्तार, राजेंद्र शेट्ये, नूतन मुख्याध्यापक उदयसिंग रावराणे, नागेश पवार आदींसह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यावेळी उपस्थित होते.संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने शमशुद्दीन आत्तार सर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालक, विध्यार्थी तसेच शिक्षक यांनीही त्यांना वैयक्तिक भेट वस्तू देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक शमसूद्दीन आत्तार सर म्हणाले, माझे बाबा आदर्श शिक्षक होते. गेली ३५ वर्षे मी माझ्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या शिक्षकी पेशात काम केले. नोकरी करत असताना कधीच माझ्या संसाराचा विचार केला नाही. माझ्या पत्नीने पूर्णपणे घर सांभाळले. तिची मला मोलाची साथ मिळाली. नोकरी करताना याच शिरगावात घडलो त्यामुळे या संस्थेचा आणि या गावाचा मी कायम ऋणी असेन.संदीप साटम यांनी आत्तार सरांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. आपले आरोग्य चांगले असेल तरच या जगात आपल्या जीवनाचं खरं मूल्य आहे. त्यामुळे मुलांनी आपले आरोग्य जपावे. असा सल्ला दिला. सूत्रसंचालन सागर करडे यांनी केले. मान्यवरानी आत्तार सरांच्या शैक्षणिक कार्याबद्दल गौरवोदगार काढले. आभार सरस्वती धुरी यांनी मानले.


Spread the love

Related posts

अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली हिरण्यकेशी येथे महाअअभिषेक संपन्न.

news

तिरोडा – आजगांव परिसरात शेतीच्या कामांना वेगवान गती 

news

मुंबई-गोवा महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करू! रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

news

Leave a Comment