क्राईमस्टोरी

नवी मुंबईत आर्थिक फसवणुकीचा सुळसुळाट; पोलीस तक्रारींकडे दुर्लक्ष

Spread the love

नवी मुंबई | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : शिपिंग, रोजगार, गुंतवणूक आणि विविध व्यावसायिक योजनांच्या आमिषाने नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक सुरू असल्याचे समोर आले आहे. शेकडो नागरिक लाखो रुपये गमावून बसले असून, त्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या तरी अनेकदा त्यांची गंभीर दखल घेतली जात नाही किंवा FIR नोंदविण्यात टाळाटाळ केली जाते.ही बाब नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेला आणि न्याय हक्काला थेट आव्हान देत आहे. अनेक पीडितांना पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे पुन्हा एकदा निराशा आणि आर्थिक हानीचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र न्यूजची मागणी : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा. आर्थिक फसवणुकीच्या प्रत्येक तक्रारीवर तात्काळ चौकशी करून FIR नोंदवण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत. तसेच अशा प्रकरणांवर सातत्याने देखरेख ठेवण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल आणि नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित होईल.नागरिकांच्या पैशासोबत त्यांच्या विश्वासावरही घाला घालणाऱ्या या फसवणुकींना आळा घालण्याची वेळ आता आली आहे.


Spread the love

Related posts

ग्रामपंचायत अधिकारी परब यांचा असनियेवासियांच्यावतीने सत्कार.

news

सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आ. वैभव नाईक यांच्यावतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न…!

news

ब्रेकिंग न्यूज: तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित….!

news

Leave a Comment