स्टोरी

काव्यगंध संमेलनात अशोक मिठबांवकर यांनी गाजवली कवी मैफल.

Spread the love

मिठबाव प्रतिनिधी: शिर्डी येथील शांतीकमल हॉल मध्ये काव्यगंध ३ रे राज्यस्तरीय कविसंमेलनात उत्साहात संपन्न झाले. ज्येष्ठ चित्रपट, गीतकार, कवी व लेखक बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या ७५ कवी कवयित्रीं सहभाग नोंदविला. सकाळी १० ते सायंकाळी ७ वा.वेळेत रंगलेल्या मैफलीत साहित्यिक प्रेम, निसर्ग , स्त्रीशक्ती , मानवी भावभावना समाजव्यवस्था आणि ग्रामीण जीवनावर आधारित दर्जेदार कविंचे सादरीकरण करण्यात आले.आणि ११ कवी कवयित्रींची यांची काव्यसंग्रह पुस्तक प्रकाशित करण्यात आली तसेच मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला .या प्रसंगी बाळासाहेब गिरी, हेमलता गिते,भारत सातपुते, अमोल चिने, गजानन उफाडे, रज्जाक शेख, उपस्थित होते.या यशस्वी राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन काव्यगंध साहित्य समूहाच्या संस्थापिका ॲड. अक्षशिला शिंदे आणि प्रशांत गोरे यांनी केले होते.त्यात कोकणातील देवगड – मिठबांव गावचे सुपुत्र कवी अशोक मिठबांवकर यांनी कविता सादर केली.त्यांच्या कवितेला उपस्थितानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Spread the love

Related posts

माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांचं निधन.

news

चिंचवली गावातील कुंभारकर कुटूंबियांचे घर आगीत जाळून खाक!शहर प्रमुख महेश गायकवाड यांची ५० हजारांची तातडीची मदत

news

केनिया नैरोबी येथे होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातून सुमारे ६० साहित्यिक, लेखक, कवी रवाना.

प्रसाद परब

Leave a Comment