स्टोरी

झाराप गावचे सुपुत्र श्री.लक्ष्मण कुशा पाटकर कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित.

Spread the love

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील झाराप गावचे सुपुत्र श्री.लक्ष्मण कुशा पाटकर यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील कामगीरीची दखल घेऊन कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.श्री.लक्ष्मण पाटकर यांना यापूर्वी राज्यस्तरीय कुसुमाग्रज काव्य पुरस्कार,वि.वा.शिरवाडकर साहित्य रत्न पुरस्कार, सर्वद फॉऊंडेशनच्या सर्वोत्कृष्ट साहित्यीक पुरस्कार, आदर्श मुंबई फॉऊंडेशनचा भारतरत्न गौरव श्री राज्यस्तरीय पुरस्कार ई. पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“कोकण दीप” मासिकाच्या २४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे १४ जून २६ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार, संपादक (दैनिक प्रहार) डॉ.सुकृत खांडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.रामचंद्र नागरगोजे, या.श्री.सुधीरभाऊ कदम शिवसेना संपर्कप्रमुख- दापोली विधानसभा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.डॉ.सुकृत खांडेकर यांनी आपल्या भाषणात पत्रकारीता आजची- कालची यावर परखड आणि स्पष्ट विचार मांडले.बाळशास्री जांभेकर, लोकमान्य टिळक, प्र.के.अत्रे ही सिद्धहस्त पत्रकार मंडळी त्याकाळी अन्याय, अत्याचार यांच्या विरोधात धार धार शब्दात स्पष्टपणे आणि परखडपणे प्रहार करत सरकारला सळो की पळो करून सोडत आणि लोकशाहीच्या चौथा खांब अधिकाधिक मजबूत करत मात्र आजची पत्रकारिता ही तशी राहिलेली नाही.असं सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली.कोकण दीप मासिकाचे संपादक श्री.दिलीप शेडगे यांनी तळागाळातील समाजीक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या मंडळीची दखल घेऊन त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा गौरव करण्यासाठी सदर सोहळा आयोजित केला होता.


Spread the love

Related posts

सावंतवाडी मोती तलावा मधील हिरवा तेलकट तवंग नष्ट करण्यासाठी उपाययोजना करा! सामाजिक बांधिलकीची मागणी

news

कोलकाता उच्च न्यायालयाचा शिवलिंगाला हटवण्याचा आदेश लिहितांना न्यायालयाचे अधिकारी बेशुद्ध पडले !

news

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या’ माध्यमातुन मोफत व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

news

Leave a Comment