क्राईम

दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला..! ९ दहशतवादी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात.

Spread the love

दिल्ली: पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं नेटवर्क यांच्याशी संबंधित ९ जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या या धाडसी कारवाईनं दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला गेला आहे. दिल्ली, मुंबई , पंजाबमधून संशयितांची धरपकड करण्यात आली आहे. मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखण्यात आला होता. पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा आयएसआयच्या इशाऱ्यावर सगळे संशयित दहशतवादी काम करत होते. पोलिसांना संशयित दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. सगळे संशयित दहशतवादी पाकिस्तानच्या आयएसआयसाठी काम करत होते.

या दहशतवाद्यांच्या या नेटवर्कमधील सर्वात जास्त दहशतवादि दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर सक्रिय होते. तर इतर दहशतवादि पाकिस्तानात बसलेल्या शहजाद भट्टीच्या ईशाऱ्यावर चालत होते. या सगळ्या कट कारस्थानामागे आयएसआयचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानमध्ये आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अत्याधुनिक परदेशी शस्त्रं, ग्रेनेड आणि स्फोटकं हस्तगत करण्यात आली आहेत. आरोपींनी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणली होती. त्यांच्याकडे विविध प्रकारची शस्त्रं मिळाली आहेत. अटक करण्यात आलेले ९ आरोपीनी यापूर्वी महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले होते. यामध्ये ऊर्जा केंद्रं, अणु प्रकल्प, वीज पुरवठा केंद्रं, विमानतळ, रेल्वे स्थानकांचा समावेश होता. देशातील महत्त्वाच्या शहरांमधील प्रमुख ठिकाणं उडवण्याचा कट रचण्यात आला होता. यावेळी जास्त गर्दी आणि वर्दळ असलेल्या ठिकाणांवर हल्ले करण्याची योजना आखण्यात आली होती.

या दहशतवाद्यांकडे पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेली स्फोटकं सफडली आहेत. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी भारतामधील काही जणांचा वापर करत होती. बाहेरील व्यक्तींना भारतात पाठवण्याची जोखीम त्यांनी घेतली नव्हती. पण दिल्ली पोलिसांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले आणि ९ संशयित दहशतवाद्यांना अटक केली. या संपूर्ण टोळीला असलेलं फंडिंग, शस्त्रांचा पुरवठा आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या टोळीचे अन्य सदस्य देशातील विविध भागांमध्ये अद्यापही सक्रिय आहेत का? याचाही शोध पोलीस घेत आहेत.


Spread the love

Related posts

काश्मीरमध्ये ३० वर्षांपासून पसार असणार्‍या ८ आतंकवाद्यांना अटक !

news

शिर्डी येथे ‘हायप्रोफाईल सेक्स रॅकेट’ उघड

news

मोपा विमानतळावर २८ ‘आयफोन’ आणि ५.७ किलो सोने कह्यात

news

Leave a Comment