Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेचे विचार आचरणात आणा! दीपक भोगटे यांचे प्रतिपादन.

Spread the love

​मसुरे प्रतिनिधी: खरारे येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा पेंडूर खरारेच्या विद्यमाने विविध उपक्रमांनी संपन्न झाला.बॅ. नाथ पै सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन फक्त दलितांसाठी नव्हे तर समस्त भारतीयांच्या उन्नतीसाठी अर्पण केले. शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा ही त्रिसूत्री प्रथम स्वतः आचरणात आणली व नंतर आपल्या बांधवांना उपदेश केला. स्वतः उच्च शिक्षण घेतले. सिद्धार्थ व मिलिंद महाविद्यालय स्थापन करून उच्च शिक्षणाची सोय केली. त्यांच्या विचाराने कायम काम करावे असे आवाहन त्यांनी केले.​

बौद्ध महासभा सिंधुदुर्ग सरचिटणीस संजय पेंडूरकर यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या चरित्राचा आढावा घेतला. मजूरमंत्री असताना त्यांनी प्रसुती रजा, कामाचे तास, किमान वेतन याविषयी अनेक कायदे केले. संविधानामध्ये महिलांनाही मतदानाचा अधिकार दिला. त्यांचे ऋण सर्वांनी मानलेच पाहिजे असे ते म्हणाले. भारतीय ​बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणचे अध्यक्ष रविकांत कदम यांनी उपस्थितांना बाबासाहेबांच्या कार्याची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत अपमानास्पद वागणूक सोसून आयुष्य शिक्षण घेतले. त्याचा उपयोग समस्त भारतीय बांधवांसाठी केला. व अखेर क्रांतिकारी व विज्ञानवादी बौद्ध धर्मात प्रवेश करून खऱ्या अर्थाने बौद्ध विचाराचा प्रसार केला.

जिल्हा पर्यटन सचिव विलास वळंजू ​यांनी सुद्धा गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेतला. ​नचिकेत पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा, अहिंसेचा विचार आपण अंगीकारला पाहिजे. आपल्या समाजात ज्या अनिष्ट प्रथा आहेत, अंधश्रद्धा आहेत त्यांचा त्याग करून, व्यसनांन पासून दूर राहून डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी कार्य करण्याची गरज त्यांनी विषद केली.​

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पेंडूरकर व अर्जुन पेंडूरकर यांनी केले.​ यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृष्णा पेंडुरकर होते तर संजय पेंडूरकर, दीपक भोगटे, सुभाष सावंत, गजानन सावंत, नचिकेत पवार, रविकांत सावंत, अर्जुन पेंडूरकर, अपेक्षा पेंडूरकर, स्नेहा पेंडुरकर, चंद्रकांत पेंडूरकर, डॉ. उमेश पेंडूरकर, संदीप सावंत, सचिन कासले, समता डीकवलकर, गजानन सावंत उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कलंबिस्त येथील पूल दुरुस्तीसाठी महिन्याभराच्या आत निधी देण्याचे दिपक केसरकरांचे आश्वासन…..

news

आजपर्यंत अनेकांच्या पालख्या आपण उचलल्या, आता आपली पालखी आपण उचलायची म्हणून कोमसापची निर्मिती”..! मधु मंगेश कर्णिक.

प्रसाद परब

अल्पवयीन मुलाला गाडी चालवू दिल्याप्रकरणी वडिलांना २५ हजारांचा दंड.

Leave a Comment