Uncategorized

मसुरे येथील बागवे हायस्कूलच्या माजी विध्यार्थ्यांकडून शाळेला २० हजारांची देणगी ; दोन विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले.

Spread the love

​​​मसुरे प्रतिनिधी: मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलच्या सन २००३-०४ मधील एस.एस.सी. बॅचचे स्नेहसंमेलन नुकतेच विद्यालय परिसरात अत्यंत उत्साहात आणि भावुक वातावरणात संपन्न झाले. तब्बल दोन दशकांनंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत शाळेच्या विकासासाठी वीस हजार रुपयांची रोख देणगी सुपूर्द केली. तसेच, सामाजिक बांधिलकी जपत चालू शैक्षणिक वर्षात शाळेतील दोन गरजू विद्यार्थ्यांना ‘दत्तक पालक योजने’ अंतर्गत दत्तक घेण्याचा स्तुत्य निर्णय या बॅचने घेतला आहे.​स्नेहसंमेलनाच्या सुरुवातीला अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने गुरुजनांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच उपस्थित सर्व शिक्षकांवर विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी केली. आपल्याच हाताखाली शिकलेली मुले आज विविध क्षेत्रांत यशाशिखरावर पोहोचूनही, त्यांनी दाखवलेल्या या आदरभावामुळे सर्वच शिक्षक अत्यंत भारावून गेले होते.​त्यानंतर मुख्य कार्यक्रमात सर्व शिक्षकांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करून स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.​या भावनिक सोहळ्यात माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षकांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देत, “विद्यार्थ्यांनी राखलेली ही कृतज्ञता आणि त्यांनी सामाजिक भान ठेवून सुरू केलेले उपक्रम हीच आमच्यासाठी खरी गुरुदक्षिणा आहे,” अशा शब्दांत कौतुक केले.

तर माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील गमतीजमती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आर. पी. बागवे हायस्कूलने लावलेली शिस्त यामुळेच आम्ही आज आयुष्यात यशस्वी होऊ शकलो अशी कृतज्ञ भावना व्यक्त केली. ​या स्नेहसंमेलनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, पुणे व इतर भागांतून २००२-०३ बॅचचे असंख्य माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बऱ्याच वर्षांनी एकमेकांना भेटल्यामुळे मित्र-मैत्रिणींमध्ये आनंदाचे वातावरण होते. संपूर्ण परिसर ‘बॅक टू स्कूल’च्या गप्पांनी आणि आठवणींनी जिवंत झाला होता.​विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या सामाजिक आणि शैक्षणिक पुढाकाराबद्दल मसुरे परिसरातून आणि आर. पी. बागवे हायस्कूल प्रशासनाकडून या बॅचचे विशेष कौतुक व आभार मानले जात आहेत.यावेळी संस्था पदाधिकारी, शिक्षक, विध्यार्थी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका;

news

सावंतवाडी नगरपरिषद फायर फायटर श्रेयवाद सुरू असताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आग विझवून केले फायर फायटरचे उद्घाटन.

news

तीस्ता सेटलवाडच्या जामीन अर्जाला गुजरात सरकारचा उच्च न्यायालयात विरोध! २००२ गुजरात दंगल प्रकरण….

news

Leave a Comment