क्राईम

कामोठेतील विनम्र सोशल क्लबमध्ये अवैध जुगाराचा धडधडीत अड्डा

Spread the love

कामोठे | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : कामोठे पोलीस स्टेशन हद्दीतील विनम्र सोशल क्लबमध्ये विश्वनाथ हेगडे यांच्या नेतृत्वात उघडपणे जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अड्ड्यामुळे अनेक कुटुंबांचा संसार उध्वस्त झाला असून, अनेक तरुण आणि कुटुंबप्रमुख आर्थिक आणि मानसिकरित्या बरबाद झाल्याची गंभीर तक्रार नागरिक करत आहेत.पोलीस प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जुगाराच्या या सुळसुळाटीमुळे समाजातील तरुण पिढी दिशाहीन होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कुटुंबव्यवस्थेच्या रक्षणासाठी प्रशासनाने त्वरित पाऊले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Spread the love

Related posts

आंबोली वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांनी चौकूळ शिकार प्रकरणात केलेला तपास पूर्णतः योग्य नाहीच.

news

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मालवण वेरळ माळरानावर २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेलची उलटीसदृश पदार्थाचे तुकडे केले जप्त!

news

पेण येथे लक्‍झरीमधील प्रवाशांना मारहाण करत १५ तोळे सोने लुटले मुंबई-गोवा महामार्ग असुरक्षित !

news

Leave a Comment