स्टोरी

कवी दीपक पटेकर यांच्या “बकुळीची फुले” ला “सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह” हा तितीक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार जाहीर

Spread the love

पुणे: तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत, तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित “तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार २०२६” चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या वृत्तबद्ध कवितांच्या “बकुळीची फुले” या काव्यसंग्रहाला “सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह” हा तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार दिनांक ०६ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या तितिक्षा कला साहित्य संमेलनात सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

मराठी भाषेतील दर्जेदार साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी तितिक्षा भावार्थ पुणे या संस्थेकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी हे आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. या पुरस्कारांसाठी डिसेंबर २०२४ ते मार्च २६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या ललित, कविता, कथा, कादंबरी, नाटक, लेख संग्रह, विनोदी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, शैक्षणिक, बाल साहित्य अशा विविध साहित्य प्रकारात लेखन करणाऱ्या सारस्वतांकडून साहित्यकृती मागविण्यात आल्या होत्या. संस्थेकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करून दिनांक २५ मे २०२६ रोजी विविध प्रकाराच्या साहित्यकृतींना पुरस्कार जाहीर करण्यात आले. दीपक पटेकर यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाला मिळालेल्या पुरस्कारासाठी त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत ७२ रिक्त जागांसाठी होणार भरती !

news

नवी मुंबई विमानतळाजवळील मार्गांवर दि.बा. पाटील यांच्‍या नावाचे फलक लावले !

news

चिनी सीमेवर सर्व काही आलबेल होईपर्यंत चीनचा कुठलाही नवा प्रस्ताव भारत स्वीकारणार नाही

news

Leave a Comment