सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी विभव इंटरनॅशनल कल्चरल एज्युकेशन अँड सोशल फोरम आणि महाराष्ट्र मंडळ नैरोबी यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन नैरोबी केनिया येथे २ मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागाच्या वतीने हे दुसरे मराठी साहित्य संमेलन भरत आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून हे दुसरे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन केनिया या देशात होत आहे. यासाठी महाराष्ट्रातून सुमारे ६० साहित्यिक लेखक कवी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे या मराठी साहित्य संमेलन केनिया येथे होत आहेत. त्या आयोजन समितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी राज्याचे माजी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर व राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून पहिले आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा हे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन केनिया येथे होत आहे.
शनिवारी २ मे रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी ६ या वेळात हे संमेलन होणार असून या संमेलनात मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे उपस्थित राहणार आहेत. तर संमेलन अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र शोभणे, स्वागताध्यक्ष डॉक्टर ज्योती त्रिवेदी, उद्घाटक महाराष्ट्र मंडळ नैरोबी चे प्रशांत मोहिते, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ, महाराष्ट्र मंडळाचे विश्वस्त अजय आपटे, समीर मुनाशी, संदीप पाटणकर, मकरंद कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपा ठाणेकर तर आभार प्राध्यापक मंदार टिल्लू हे करणार आहेत दुसऱ्या सत्रात सकाळी ११:३० ते १ या वेळेत अमृता वसा व अनिरुद्ध जोशी, कौशल्य इनामदार यांचा कार्यक्रम होणार आहे. तिसऱ्या सत्रात २ ते २:३० या वेळेत फुला कला मंच विविध कलाविष्कार सुधीर शेटे आणि मंगेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. तर चौथ्या सत्रामध्ये ३ ते ४:३० या वेळेत आनंद यात्रा व्याख्यान होणार आहे. प्राध्यापक प्रसाद कुलकर्णी हे करणार आहेत. तर पाचवे सत्र ४:३० ते ५:३० गझल आणि कविता या कार्यक्रम होणार आहे. अध्यक्ष ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर सादर करते प्रसाद कुलकर्णी, दिलीप पांढरपट्टे, प्राध्यापक अरुण म्हात्रे, समारोप सायंकाळी ५:३० ते ६ संमेलन अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे उद्घाटक महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष प्रशांत मोहिते आदींच्या उपस्थित होणार आहे. या आयोजन समितीमध्ये संजय केळकर, अनुप कर्णिक,नमिता कीर, प्राध्यापक प्रदीप ढवळ, दीपा ठाणेकर, सुधीर शेटे, मंगेश मस्के, प्राध्यापक हर्षला लिखिते, मंदार टिल्लू, गौतम थोरवे, अमोल आपटे, दिलीप ठाणेकर, डॉक्टर जालंदर भोर, डॉक्टर ज्योती त्रिवेदी, अजय आपटे, समीर मुनाशी, संदीप पाटणकर, मकरंद कुलकर्णी, प्रशांत मोहिते, नवनाथ वायकर, अशोक पवार यांचा समावेश आहे.
