सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे व्हेंटिलेटरवर आहे. शासकीय रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे भरली जात नाहीत. सिंधुदुर्ग टू गोवा बांबुळी रेफर हे कित्येक वर्ष सुरूच आहे. निवडणुका आल्या की फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम केली जाईल. मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल असे अनेक प्रश्न निवडणुकीत चर्चिले जातात. रुग्णांची होणारी सुसे होलपाट कधी थांबणार? की आम्हाला फक्त आश्वासनांचाच गाजर मिळणार? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार सावंतवाडी येथे पहिल्यांदाच भरवण्यात आलेल्या जनता आरोग्य दरबार मध्ये नागरिकांनी मांडल्या. शासकीय रुग्णालय दर्जेदार आणि औषध पुरवठा तसेच सर्व सुविधा तज्ञ डॉक्टर हे आम्हाला कधी मिळतील? सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्यावर आनंद होईल असा दिवस कधी उजाडेल? या दिवसाची आतुरतेने वाट सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनता पाहत आहे.
सिंधुदुर्ग टू गोवा रेफर मुक्त जिल्हा आम्हाला पाहायचा आहे. अशा समस्यांचा तक्रारींचा पाढा आजच्या आरोग्य जनता दरबारात ऐकायला मिळाला. तब्बल तीन तास सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेनेचा पोलखोल उपस्थित नागरिक यांनी केला. या सर्व आरोग्य यंत्रणेच्या समस्यांच्या तक्रारी आणि जनतेचा आवाज शांतपणे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल यांनी ऐकून घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा निश्चितपणे सुधारेल आता येणारा काळ आरोग्य यंत्रणा अधिक बळकट झालेलीच दिसेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राजकीय नेतेमंडळी अनेक संघटना मंडळे आणि जनतेला सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आणि बळकट झालेली हवी आहे आणि त्यासाठी आमचे सर्वांचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत. असे आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा मायनिंग फंडातून डॉक्टर अतिरिक्त पगार देण्याचा पॅटर्न राबवला जाईल. विशेष करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात हा पॅटर्न राबवण्यासंदर्भात आपण पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांना विनंती केली आहे. हे जर झाल्यास निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिरिक्त डॉक्टरांचा प्रश्न कायमचा सुटेल आणि आरोग्य यंत्रणा सक्षम बनेल. असे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या जनता आरोग्य दरबाराचे फलित झाले ते आमदार दीपक केसरकर यांनी जनता दरबारातच सर्व नागरिकांच्या उपस्थितीत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दोन डायलेसिस मशीन खरेदीसाठी आपल्या आमदार निधीतून वीस लाख रुपयाचे पत्र दिले आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी भरघोस निधी आपण यापूर्वी दिला आहे आणि यापुढेही देईन पण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेला आरोग्यदृष्ट्या काहीही कमी पडू देणार नाही. याची हमी दिली.
सावंतवाडी बॅ. नाथ पै सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय जनता आरोग्य दरबार आज बुधवारी भरवण्यात आला होता. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती अभिनय फाउंडेशन आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जनता आरोग्य दरबाराचे नियोजन करण्यात आले होते. हा उपक्रम म्हणजे जनतेच्या आरोग्य दृष्ट्या तक्रारी समस्या आणि थेट जनतेला या दरबाराच्या माध्यमातून आरोग्यदृष्ट्या आपल्या व्यथा मांडण्याचा एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात आला. या आरोग्य जनता दरबाराचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन आमदार दीपक केसरकर व संवाद तरुण भारत चे सिंधुदुर्ग रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर आरोग्य तज्ञ डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. धनंजय काकडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्यसभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, नगरपालिका आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे अध्यक्ष एन. बी. रेडकर, ओंकार तुळसुलकर, प्रा. सुभाष गोवेकर, पंचायत समिती सदस्य शरद धाऊस्कर, विनोद शेंडे, शकुंतला भालेराव, डॉक्टर न्यानेश्वर ऐवाळे, डॉक्टर संदीप सावंत, डॉक्टर चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, सतीश बागवे, रवी जाधव, संजय लाड, रूपाली मुद्राळे, समीरा खलील, नंदन वेंगुर्लेकर, तेजस परब, अशोक पेडणेकर, जितू मुरगटकर, किशोर चिटणीस, राजू किर्लोस्कर उपस्थित होते.
या आरोग्य जनता दरबारात सिंधुदुर्ग जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रे पासून ते उपजिल्हा रुग्णालय शासकीय रुग्णालय ही सर्वच रुग्णालयात डॉक्टरांची रिक्त पदे तसेच तज्ञ डॉक्टर नाहीत. फक्त शासकीय रुग्णालय म्हणजेजणू कोंडवाडा अशी स्थिती आहे. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अपघाताचा किंवा अन्य कुठलेही रुग्ण असो. ते फक्त गोवा बांबुळी येथे रेफर केले जात आहेत. दर दिवसाला जवळपास सरासरी सहाच्या संख्येने रुग्ण गोवाबांबुळी येथेच पाठवले जात आहेत. गोवा येथे हा बाहेरचा रुग्ण अशी हिनवणी होत आहे. मग हे आता किती दिवस चालणार अशा अनेक प्रश्नांचा भडीमार उपस्थितनागरिकांनी केला. सावंतवाडी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चा मुद्दा फक्त प्रत्येक निवडणुकीला येतो मात्र त्यापुढे काही होतच नाही. हे आता आणखीन किती दिवस चालणार? रुग्णवाहिका तसेच शासकीय रुग्णालयातील व्यवस्था पूर्णपणे बिकट आहे. परिचारिका तसेच कर्मचारी यांच्याही समस्या अनेक आहेत. अशा अनेक तक्रारी आणि समस्या व्यक्त केल्या. यावेळी हेमंत वागळे, प्रसाद परब, गणेश प्रसाद गवस, रूपाली पाटील, सुधीर पराडकर, ॲड. संदीप निंबाळकर, तारकेश सावंत, सूर्या पालव, रवींद्र ओगले, संजय पिळणकर आदींनी आपली मते व्यक्त केली.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आरोग्य यंत्रणा सुधारणार श्री केसरकर म्हणाले. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची आणि विशेषता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. पण कॉन्ट्रॅक्टरांची लॉबी फार वाईट आहे. ते कामच करत नाहीत. अशी शोकांतिका त्यांनी मांडली मी मुंबईचा पालकमंत्री असताना मुंबईची शासकीय हॉस्पिटलची स्थिती दर्जेदार बनवली कारण त्या ठिकाणी काम करणारी यंत्रणा सक्षम आहे. आम्ही निधी मोठ्या प्रमाणात देऊ शकतो. पण काम करून घेणारी यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आपण तिन्ही तालुक्यात शासकीय रुग्णालय आणि ग्रामीण भागातील उपकेंद्रे आरोग्य केंद्र दर्जेदार असावीत. यासाठी इमारती तसेच त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली डायलेसिस मशीन मी आमदार फंडातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून दिले आहे. खरंतर मराठा विदर्भ या भागात जो पॅटर्न राबवला जात आहे. तेथील मायनिंग फंडातून डॉक्टरांना अतिरिक्त पगार दिला जातो आणि त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मायनिंग फंडातून आरोग्य विभागासाठी निधी द्यावा आणि त्यातून डॉक्टरांना अतिरिक्त पगार देण्याची व्यवस्था करावी. अशी विनंती मी जिल्हाधिकारी यांना केली आहे आणि ही बाब जर प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली. तर निश्चितपणे या भागाचे आरोग्य यंत्रणा आणि डॉक्टर उपलब्ध होणे सुलभ होईल. तसेच आपण पालकमंत्री असताना डॉक्टर भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांना अधिकार दिले आहेत आणि तीच पद्धत आताही चालू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आरोग्य यंत्रणा गोवा मेडिकल वर अवलंबून आहे असं म्हणणं चुकीचं आहे. पण आपणच पालकमंत्री असताना गोवा मेडिकल हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुले तून पैसे देत आहोत. त्यामुळे गोवा मेडिकल मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णाचे उपचार घेत आहेत. ते महाराष्ट्र शासनाच्या पैशातून त्यामुळे गोवा हॉस्पिटलमोफत सेवा देत नाही. त्यामुळे त्यांनी सुरळीत सेवा द्यावी. ही आपली अपेक्षा आहे. निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आणि तेथील समस्या निश्चितपणे सोडवल्या जातील. असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल याने अध्यक्ष भाषण करताना स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा निश्चितपणे बळकट होण्याच्या दृष्टीने आमचे सर्वांचे प्रयत्न आहे. येणारा काळा आरोग्य यंत्रात सक्षम होण्याच्या दृष्टीने ही नांदी असल्याचे ते म्हणाले गोवा रेफर होण्याचे चित्र पुढील काळात बदलले जाईल आरोग्य यंत्रणेचे चांगले दिवस निश्चितपणे येतील पूर्वी जसं मनीऑर्डर चा जिल्हा म्हणून हिणवले जात होते आणि आता जिल्हा पूर्णपणे स्वतःच्या आर्थिक क्षमतेवर सक्षम झाला आहे आणि त्याच पद्धतीने पुढील काळात शासकीय मेडिकल कॉलेज तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम बनवलीजाईल सर्वांच्या सहकार्याने हे केले जाईल. ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रे या ठिकाणची सर्व सुविधा तसेच औषध पुरवठा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने बैठक घेतली जाईल. आरोग्य जनता दरबार हा उपक्रम आयोजन केले. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
