सावंतवाडी: गुरुपौर्णिमा यानिमित्त कळसुलकर हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे पाद्यपूजन हा आगळावेगळा संस्कारक्षम कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे गावचे माजी प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री रत्नाकर धाकोरकर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस.व्ही.भुरे यांनी संस्था प्रशाला यांच्या वतीने प्रमुख अतिथींचे शाल श्रीफळ व गुरुपौर्णिमा या निमित्त विशेष प्रशालेतर्फे भेटवस्तू देऊन गुरूबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी व्यासपीठावर प्रशालेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी यांचे विद्यार्थ्यांना संदेश पर मार्गदर्शन केले तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी त्यांनी गुरु बद्दल आदर आपुलकी सन्मान तसेच त्याचे महत्त्व विशद केले. यावेळी उच्च माध्यमिक विभागातील श्री पाटील सर यांनीही गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या, यावेळी पालक वर्गातून प्रशालेच्या प्रयोगशाळा सहाय्यक श्रीमती वर्षा बल्लाळ- केसरकर यांनीही गुरु बद्दलची तसेच सन्मान सोहळा खरोखर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे असे विशद केले. पालकांमधून श्रीमती हेमांगिनी प्रमोद देसाई यांनीही हा कार्यक्रम उत्कृष्ट व आयोजनाबद्दल प्रशालेतील शिक्षक वृंदांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांमधून कुमारी दुर्वा केसरकर व कुमार चिन्मय कोटणीस तसेच उच्च माध्यमिक विभागातील कु.भूमिका घाडी, कु.समृद्धी पंदारे व कु.वडार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक समिती प्रमुख श्री दिगंबर सारंग व सहकारी शिक्षक यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिगंबर सारंग यांनी तर आभार श्री अनिल ठाकूर यांनी मानले.
