स्टोरी

अखिल प्राथमिक शिक्षक संघातर्फे महिला दिन उत्साहात संपन्न.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व महिला सेल सावंतवाडी आयोजित जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आदरणीय सभापती महोदया सुस्मिता जाधव पंचायत समिती सावंतवाडी, आदरणीय वासुदेव नाईक गटविकास अधिकारी पंचायतसमिती सावंतवाडी, म. ल. देसाई राज्य उपाध्यक्ष शिक्षक संघ, सर्व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सावित्रीबाई फुले व अखिल संघाचे प्रेरणास्थान स्व. सुलभाताई दोंदे यांच्या प्रतिमेला हार घालून सुरुवात केली. यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे नूतन सभापती सन्माननीय सुश्मिता जाधव यांची निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी माननीय वासुदेव नाईक यांची विभाग स्तरावर उत्कृष्ट गटविकास अधिकारी म्हणून निवड झालेली आहे व त्यांचा शासनातर्फे गौरव करण्यात आला. त्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

आपले मनोगत व्यक्त करताना म. ल. देसाई यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ राबवित असलेल्या विविध सामाजिक शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी अखिल संघाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. शिक्षणाबरोबर सामाजिक उपक्रमात सहभागी होणारी अखिल संघ एक अग्रणी संघटना आहे असे मत व्यक्त केले. पंचायत समिती सभापती महोदया मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या अखिल संघाचे विविध उपक्रम ऐकून समाधान वाटले. आपले पण येत्या पाच वर्षात अखिल संघाला पूर्ण सहकार्य असेल असे मत व्यक्त केले. अखिल संघाचे तालुकाध्यक्ष विजय गावडे यांनी अखिल संघाच्या वर्षभरातील राबविण्यात आलेल्या विद्यार्थी, शिक्षक व सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शुभेच्छा सावंत अखिल संघ महिला सेल अध्यक्ष यांनी भूषविले. व्यासपीठावर राज्य महिला सेल सदस्य सृष्टी पाटील,जिल्हा सरचिटणीस महेश पालव,जिल्हा महिला सेल अध्यक्षा तेजस्विता वेंगुर्लेकर, सावंतवाडी महिला सेल अध्यक्षा शुभेच्छा सावंत, सावंतवाडी पतपेढी संचालक सुभाष सावंत, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, महिला सेल सचिव रोशनी राऊत उपस्थित होत्या.

पाककला स्पर्धेत ३० महिला शिक्षकाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सुवर्णा फाले द्वितीय क्रमांक विनया शिरसाठ तृतीय क्रमांक नेहा सावंत तर उत्तेजनार्थ वर्षा देसाई व अदिती सावंत यांनी क्रमांक पटकाविला. वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक अमिषा कुंभार, द्वितीय क्रमांक लक्ष्मी धारगळकर तृतीय क्रमांक प्रणिता भोयर तर उत्तेजनार्थ किरण केंगार व सचला पाटील यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व तालुका पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले. तालुका सचिव रुपेश परब यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. अखिल संघाच्या सर्व शिलेदारांनी आर्थिक सहाय्य केले. राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर केलेल्या स्पर्धाचे बक्षीस वितरण मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पंडित तर रोशनी राऊत यांनी आभार मानले.


Spread the love

Related posts

केंद्र सरकारच्‍या साहाय्‍याने शेतकर्‍यांसाठी १२ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साहाय्‍य ! – मुख्‍यमंत्री

news

अमृत योजनेअंतर्गत कल्याण ग्रामिण मधील भाल गावात जलकुंभाची निर्मिती!

news

मुसळधार पावसात नारायण ठाकूर यांचे घर जमीनदोस्त..!

news

Leave a Comment