शिक्षण

देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात “वेस्ट मॅनेजमेंट” उपक्रम साजरा

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: “वेस्ट मॅनेजमेंट” या उपक्रमाखाली विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवणे हा उपक्रम सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केला. यावेळी विद्यार्थ्यांनी वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत पर्यावरण पूरक अशा वस्तू साकारत जुन्या पासून नव्हे पण टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याची कला अवगत केली आणि उपस्थित सर्वांचे दाद मिळवले. वर्तमानपत्र तसेच पुट्टे, नारळाच्या सोंडा पासून डस्टबिन अशा विविध वस्तू बनवल्या. यावेळी वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर प्राध्यापक साईप्रसाद पंडित यांनी मार्गदर्शन केले. आपल्या असलेल्या या उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्ती मध्ये अनेक वस्तू वेस्ट याचाच अर्थ फुकट जात असतात त्यांचं यथार्थ नियोजन केलं. व्यवस्थापन केलं तर त्या असलेल्या साधनांचा व्यवस्थितरित्या उपयोग करता येतो. यालाच आपण वेस्ट मॅनेजमेंट असे म्हणतो. असे प्रतिपादन प्राध्यापक साईप्रसाद पंडित यांनी विद्यार्थ्यां ना केले.

त्याचबरोबर प्राध्यापिका तृप्ती नाईक यांनी टाकाऊ पासून टिकाऊ या उपक्रमासाठी कशा प्रकारे नियोजन करता येते याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या उपक्रमामध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी घरात असलेल्या टाकाऊ वस्तु पासून वेगवेगळ्या कलात्मक अशा वस्तू बनवल्या आणि ज्या या उपक्रमाच्या आकर्षण बिंदू ठरल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री यशोधन गवस यांनी या उपक्रमाचे परीक्षण केले व या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले अशा वस्तूंपासून आपण कलात्मक वस्तू बनवून आपण एक त्याला व्यावसायिक रूप देऊ शकतो. असे प्रतिपादन केले. यावेळी मिताली नाईक, संतोषी पाटील, मुक्ताई सावंत, कृषी मोरया, तनवी घाडी, रश्मी साळगावकर, हर्षदा सावंत, तन्मय पारसेकर, अथर्व केसरकर, अथर्व तेली आदिनी सहभाग घेतला. यावेळी सर्व विद्यार्थी व प्राध्यापक अस्मिता गवस, आनंद नाईक, शैलेश गावडे, मेधा मयेकर आदी सहभागी झाले.


Spread the love

Related posts

इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा आजपासून सुरु…!

news

शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये भगवती हायस्कुलचे १०० टक्के यश..!

news

श्री भगवती हायस्कुल मुणगेच्या देवांग मेस्त्रीची कलाकृती राज्यात प्रथम!

news

Leave a Comment