स्टोरी

महाराष्ट्र शासन भाषा मंत्रालयाच्या वतीने २०२६ बाल मराठी साहित्य संमेलन संपन्न.

Spread the love

नवी मुंबई (वाशी): महाराष्ट्र शासन भाषा मंत्रालयाच्या वतीने २०२६ बाल मराठी साहित्य संमेलन नवी मुंबई वाशी येथील सिडको भवन च्या स्वर्गीय दिबा पाटील मुख्य मंचावर सोमवार दि. १६ मार्च रोजी संपन्न झालं. यावेळी सकाळच्या सत्रात अतिशय उत्साहपूर्ण आणि विविध कलाने नटलेली वेशभूषणे नटलेली मराठी भाषेचा गौरव करणारी ग्रंथ दिंडी वाशी शहरांमधून काढण्यात आली. शिवाजी चौक ते स्वर्गीय देवा पाटील मुख्य मंच सिडको भवन अतिशय तालासुरात हि दिंडे काढण्यात आली.

या दिंडीमध्ये महाराष्ट्राच्या प्रशासन विभागाचे सर्व पदाधिकारी तसेच महाराष्ट्रातील बालसाहित्यिक रंग बाल रंगभूमीचे कलाकार उपस्थित होते. अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे, सचिव डॉक्टर शामकांत देवरे साहेब, ॲडव्होकेट निलम शिर्के- सामंत मॅडम, सर्व पदाधिकारी, भाषा मंत्रालय, भाषा विकास पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे पदाधिकारी या सर्वांनी या ग्रंथ दिंडीत भाग घेतला.

त्यानंतर स्वर्गीय दि बा . पाटील मुख्यमंचावर महाराष्ट्र राज्य स्तरावर प्रथम क्रमांकाने गाजलेली बालनाटिकेचे सादरीकरण करण्यात आलं. या विशेष बाल साहित्य संमेलनामध्ये सिंधुदुर्गातून विश्व निर्मितीचे माननीय सदस्य महादेव लक्ष्मण देसाई अर्थात म .ल .देसाई आणि साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कविवर्य विठ्ठल कदम हे उपस्थित होते. हे सिंधुदुर्गाला भूषणावह होते.


Spread the love

Related posts

पुण्यश्लोक अहिल्या बाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ‘अहिल्या भीम पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन.

news

अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी यशवंत जाधव.

news

माजी पंचायत समिती सदस्य श्री संदिपजी गावडे यांच्या हस्ते मळगाव हायस्कूल येथे वह्या वाटप!

news

Leave a Comment