जळगाव जिल्हा प्रतिनिधी (शेख शरीफ): सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि शांततेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटना (IHRPDA) ने हमीद इस्माईल तडवी यांची महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयक म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. संघटनेकडून त्यांना अधिकृत ओळखपत्र (ID) प्रदान करण्यात आले असून, राज्यभर संघटनेच्या माध्यम समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील मानवाधिकार, सामाजिक न्याय, शांतता आणि जनजागृतीविषयक उपक्रमांना अधिक प्रभावीपणे प्रसिद्धी मिळणार असून, संघटनेच्या कार्याचा विस्तार करण्यास मदत होणार आहे.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटना (IHRPDA) ही “मानवता, शांती, न्याय आणि समानता” या ध्येयवाक्याने कार्यरत असून, देशभरात मानवी हक्कांचे संरक्षण, सामाजिक सलोखा, शांतता प्रस्थापित करणे आणि वंचित घटकांच्या न्यायासाठी विविध उपक्रम राबवत आहे.हमीद इस्माईल तडवी यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
