स्टोरी

विजय येळावीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदाश्रमातील ज्येष्ठांना उपयुक्त भेटवस्तूंचे वाटप.

Spread the love

कुडाळ प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत श्री. विजय प्रल्हाद येळावीकर यांनी आपला वाढदिवस जीवन संजीवन सेवा ट्रस्ट संचलित आनंदाश्रम, कुडाळ येथे ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा केला. यावेळी वाढदिवसानिमित्त केक कापून आनंदाश्रमातील ज्येष्ठांना उपयुक्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या आनंदात सहभागी होत वाढदिवसाला सेवाभावाची जोड देण्यात आली. या उपक्रमामुळे आनंदाश्रमातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव उमटले.या कार्यक्रमास जीवन संजीवन सेवा ट्रस्टचे संचालक श्री. काका परब, सौ. उज्ज्वला येळावीकर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिंधुदुर्ग जिल्हा महिला संघटक, महाराष्ट्र लोकाधिकार समिती, सिंधुदुर्ग जिल्हा महिला संघटक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षा) तसेच ट्रस्टचे पदाधिकारी, कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.वाढदिवसासारखा आनंदाचा क्षण समाजातील ज्येष्ठांसोबत साजरा करून सेवाभावाचा आदर्श निर्माण केल्याबद्दल उपस्थितांनी श्री. विजय येळावीकर यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.


Spread the love

Related posts

राष्ट्रध्वज घेऊन घरोघरी फडकवावा! डाकघर अधीक्षक मयुरेश कोले.

news

सावंतवाडीतील ग्रामंस्थ रुपेश तेली यांच्या घराजवळील माडबागायती मध्ये आढळली देवगांडूळाची अंडी.

प्रसाद परब

न्हावेलीत विजेचा खेळखंडोबा…! ग्राहक हैराण 

news

Leave a Comment