स्टोरी

राजमाता जिजाऊ निमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान…! दाणोलीतील समर्थ साटम महाराज वाचनालयाचा उपक्रम 

Spread the love

ओटवणे प्रतिनिधी: दाणोली येथील समर्थ साटम महाराज वाचनालयाच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधुन ग्रामीण भागात शैक्षणिक, आरोग्य व इतर क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा राजमाता जिजाऊ सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

यावेळी व्यासपिठावर वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे, सचिव डॉ लवू सावंत, उपाध्यक्ष भास्कर परब, सदस्य डॉ विठ्ठल सावंत, गिरीधर चव्हाण, सुरेश आडेलकर, ग्रंथपाल दीपा सुकी, प्रतिभा चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी भरत गावडे यांनी उपस्थित सत्कारमूर्ती शिक्षकांचा परिचय करून राजमाता जिजाऊ जयंती दिनाचे महत्त्व विशद केले.

यावेळी ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत आरोग्य सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त परिचारिका तसेच आदर्श शिक्षिका संगीता पांडुरंग सावंत, अर्पिता राणे, परिचारिका सुप्रिया राणे, अनिता अनंत राणे, शीला डामरेकर, एस एस देसाई, सायली भरत गावडे, माधुरी चांदरकर यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सन्मानित सर्व महिलांनी आपली मनोगते व्यक्त करताना आपल्या सेवेतील चांगले अनुभव व आनंदाचे क्षण सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भरत गावडे यांनी तर आभार दीपा सुकी यांनी मानले.


Spread the love

Related posts

दोषी नेत्यांना निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घाला ! न्यायमित्र विजय हंसरिया यांची सर्वोच्च न्यायालयात शिफारस

news

राज्यात शिक्षणाचा हक्क कायद्यामध्ये कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर सुधारणा करण्यात येणार! मंत्री दिपक केसरकर

news

राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथील लाईट पोल वरील लटकता मोठा लोखंडी रॉड तुटून पडल्यास दुर्घटना होण्याची शक्यता..! रवी जाधव 

news

Leave a Comment