स्टोरी

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना कोमसापचे पुरस्कार जाहीर.

Spread the love

सावंतवाडी: कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा सावंतवाडीच्या वतीने शाखेचे दिवंगत सदस्य स्व. प्रा. मिलिंद भोसले आणि स्व. ॲड. दीपक नेवगी यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली.पुरस्कारांचे स्वरूप व मानकरी:यावर्षीचा ‘स्व. प्रा. मिलिंद भोसले सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्य, कला-सांस्कृतिक सेवा पुरस्कार’ राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांना जाहीर झाला आहे. तसेच, ‘स्व. ॲड. दीपक नेवगी सामाजिक, आध्यात्मिक, साहित्य, विधी सेवा पुरस्कार’ कीर्तनकार तथा सेवानिवृत्त जिल्हा कामगार अधिकारी शेखर पाडगांवकर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा कोमसापचे शाखाध्यक्ष दीपक पटेकर यांनी केली.

पुरस्कार वितरण सोहळा:पुरस्कारांचे वितरण शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता मळगाव इंग्लिश स्कूलच्या ‘चिंतन, हेमंत, शैलजा परब सभागृहात’ होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस असतील.अभिवादन सभेवेळी कोमसापचे अध्यक्ष दीपक पटेकर, सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव विनायक गांवस, सदस्य दिनानाथ नाईक यांच्यासह कार्यकारिणीचे सदस्य व साहित्यप्रेमी उपस्थित होते. या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘कोमसाप’ सावंतवाडी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

जिल्हयातील ११ पोलीस अंमलदार यांचा १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनी मा. पोलीस महांसचालकांच्या हस्ते गौरव

news

सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्ग बंद! वाहतूक ठप्प….

news

धवडकी ते सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे, शिवापूर या मुख्य राज्यमार्ग १९० या रस्त्याचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते संपन्न.

प्रसाद परब

Leave a Comment