क्राईम

आंबोली धबधब्यावर पर्यटकांना बेदाम मारहाण…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आंबोली घाटातील मुख्य धबधबा येथील हॉटेल व्यवसाईकानी तेलंगणाच्या पर्यटकांना बेदाम मारहाण केलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेलंगणा येथील एक दहाजणाचां परिवार चहासाठी आंबोली मुख्य धबधबा येथे थांबले होते. त्यांनी चहा नाष्टा घेतला व पैसे दिले. पण पाच रुपये कमी असल्याने त्या दुकानदाराने त्या पर्यटकाला व त्यांच्या बायाकांमुलाना बेदाम मारहाण केली. या मारहाणीत दोन व्यक्ती गंभीर जखमी आहेत.  त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे नेण्यात आले आहे. घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून डॉक्टर रीपोर्ट आल्यावर गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण याने सांगितले आहे. तर अधिक तपास आंबोली चे पोलीस मनिष शिंदे, हवालदार करीत आहेत.

यापूर्वीहि शुल्लक कारणावरून अनेक वेळा पर्यटकांना मारहाण करण्यात आलेली आहे. हे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी लाजस्पद आहे. असंच घडत राहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांचे येणं कमी होईल आणि आणि साहजिकच असं उद्धट वागणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांमुळे अनेक चांगल्या हॉटेल व्यवसायिकांवर तसेच इतर व्यवसायिकांवर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची योग्य ती चौकशी होऊन व आपले संबंधित गुन्हेगारांवर योग्य ते गुन्हे दाखल करून त्यांची हॉटेल त्या त्या ठिकाणाहून काढण्यात यावी अशी पर्यटकांकडून तसेच कोकणवासीयांकडून मागणी होत आहे.

मुळात आंबोली घाटात मुख्य धबधब्यावर असलेले हॉटेल व्यवसायिक हे सगळे बेकायदेशीर रित्या हॉटेल व्यवसाय चालवत आहेत. हेही वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. तरी त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे आणि त्यातच आता अशा प्रकारचे दादागिरी हाणामारी जर होत असेल तर या ठिकाणी या हॉटेल व्यवसायिकांना व्यवसाय करायला देणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.

अशी माहिती मिळत आहे कि, सध्या आंबोली धबधब्याचे हॉटेल व्यवसायिक हॉटेल व्यवसायासाठी ज्या जागेचा वापर करत आहेत,  ही जमीन वन खात्याची असून वन खात्यातील काही अधिकाऱ्यांनी ही जमीन स्वतः काही गुपचूपरीत्या हप्ते खाऊन ह्या हॉटेल व्यवसायिकांना चालवायला दिलेली आहे.


Spread the love

Related posts

ठाणे : अवैध पाण्याच्या कॅन विक्रीचा धंदा उघडकीस; FDA ची धडक कारवाई

प्रसाद परब

मध्यप्रदेशच्या सतनामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार!

news

Crime film: 24 Live Another Day Poster Reunites Jack Bauer and Chloe O’Brian

newss

Leave a Comment