क्राईम

ग्राहक बनून आले अन् अडीच लाखांचा नेकलेस केला लंपास..! पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल

Spread the love

पणजी (दिनेश मयेकर): येथील पीएनजी गाडगीळ ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून आलेल्या दोघांनी हातोहात सुमारे अडीच लाखांचा सोन्याचा नेकलेस लंपास केला. सदर घटना मंगळवार दिनांक २५ जून २०२४ रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली. मात्र, रात्री दागिने ठेवताना मोजताना हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ज्वेलरी शोरूमच्या व्यवस्थापक यशवंत भिडे यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन तरुण काल दुपारी शोरूममध्ये आले. त्यांनी विविध डिझाईनचे नेकलेस दाखवण्यास सांगितले. कर्मचारी दागिने दाखवत होते. तेव्हाच एक नेकलेस लंपास करण्यात आला.हवा तसा नेकलेस नसल्याचे सांगून ते तेथून निघून गेले. नेकलेस चोरीला गेल्याचे रात्री दागिने मोजून ठेवताना लक्षात आले. पोलिस तपास करत आहेत.


Spread the love

Related posts

मुंबईच्या दहीसर परिसरात भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने!

news

खासदार संजय राऊत यांना मोबाईलवर धमकीचा मॅसेज

news

व्हाट्सअपद्वारे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!

news

Leave a Comment