क्राईम

काश्मीरमध्ये ३० वर्षांपासून पसार असणार्‍या ८ आतंकवाद्यांना अटक !

Spread the love

जम्मू-काश्मीर:  गेल्या ३० वर्षांपासून पसार असणार्‍या ८ आतंकवाद्यांना पोलिसांनी अटक केली. आदिल फारुख फरीदी, इश्तियाक अहमद, इक्बाल, मुजाहिद हुसेन, तारिक, एजाज, जमील आणि इश्तियाक अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व जण राज्यातच सामान्य नागरिक म्हणू रहात होते. *यांतील २ जणांना सरकारी नोकरीही मिळाली होती. एक शिक्षण विभागात, तर दुसरा न्यायालयात काम करत होता.* या सर्व आतंकवाद्यांवर अपहरण, हत्या, काश्मिरी हिंदु आणि सुरक्षदले यांच्यावर आक्रमण करण्यासाठी लोकांना चिथावणे आदी आरोप आहेत. त्यांनी त्यांच्या कारवाया मशिदींचे साहाय्य घेऊन केल्या होत्या.पोलिसांना संशय आहे की, अशाच प्रकारे अन्य पसार आतंकवादीही जम्मू-काश्मीरमध्येेच रहात असतील. जम्मू-काश्मीरमध्ये अन्वेषण यंत्रणांची २ पथके सध्या पसार असणार्‍या आतंकवाद्यांचा शोध घेत आहेत. पसार आतंकवाद्यांची संख्या ७३४ इतकी आहे. यांत काश्मीरमधील ४१७, तर जम्मूमधील ३१७ जणांचा समावेश आहे. यांतील ३६९ जणांची ओळख पटवण्यात आली आहे, तर ८० जणांचा मृत्यू झाला आहे. ४५ जण पाकिस्तानमध्ये पळून गेले आहेत. १२७ जणांची माहिती अद्याप मिळालेली नाही.


Spread the love

Related posts

हिंदु नावाने बनावट आधारकार्ड बनवणार्‍या २ धर्मांधांना अटक !अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता !

news

गोव्यात टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरून काँग्रेसकडून जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांना घेराव

news

पी.एफ्.आय.च्या ५५ समर्थकांना अटक! उत्तरप्रदेशात ३० जिल्ह्यांमध्ये आतंकवादविरोधी पथकाकडून धाडी! समाजवादी पक्षाचा नेता अब्दुल खालिक याला अटक….

news

Leave a Comment