स्टोरी

अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे ! – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Spread the love

मुंबई: राज्यशासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून चालू होणार्‍या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. गणेशोत्सव मंडळांनी mahotsav.plda.@gmail.com या इ-मेलवर अर्ज करावा. राज्यशासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै २०२३ या दिवशीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे.या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ आणि अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक याप्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास ५ लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ सहस्र रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.


Spread the love

Related posts

सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टँड समोरिल उघड्या गटाराचे काम पूर्ण!

news

जम्मूच्या डोडा जिल्ह्यामध्ये अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून २ लाख रुपये देण्याची घोषणा…..

news

कलंबिस्त ते शिराशिंगे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ग्रामस्थांचे बांधकाम कार्यकारी अभियंत्यांना निवेदन…!

news

Leave a Comment