स्टोरी

माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मुलाच्या कारचा अपघात!

Spread the love

३ सप्टेंबर वार्ता: माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मुलाच्या कारचा अपघात झाला आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी  रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मेहता यांचा मुलगा ताकषील नरेंद्र मेहता  LAMBORGHINI HURACAN COUPE MY15 कंपनीची कार क्रमांक एम.एच. 04 एच.क्यु. 0711 वांद्रेहून दक्षिण मुंबईला जाताना हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाऊस पडत असताना त्याची कार स्किड झाली आणि ती रस्त्यावरील बॅरिकेडवर आदळली. कारची एअर बॅग बाहेर येताच त्याच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. वरळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात हलवले. दरम्यान, ताकषील नरेंद्र मेहतावर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरळी पोलिसांनी त्याला नोटीस देऊन नंतर सोडून दिले आहे. ताकषील मेहता याची मेडिकल देखील करण्यात आली. तो नशेत नसल्याचे निर्दशनास आले. कार ही भरवाद वेगाने होती. त्यामुळं रस्त्याच्या बाजूस असलेल्या सुरक्षा कठड्यास वेगाने धडक दिली.

 


Spread the love

Related posts

कुडाळ मधील दोन मनोरूग्ण बांधव आश्रय आणि सुरक्षिततेसाठी संविता आश्रमात दाखल…!

news

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या!

news

कळवा (ठाणे) येथील रुग्‍णालयात एका दिवसात १८ रुग्‍णांचा मृत्‍यू !

news

Leave a Comment