स्टोरी

सावंतवाडीत येथे २२ मार्च रोजी साहित्य संमेलन होणार.

Spread the love

सावंतवाडी: कोकण मराठी साहित्य परिषदेच जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडी येथे आयोजित करण्यात येणार आहे. दि. २२ मार्च २०२५ रोजी हे साहित्य संमेलन होणार असून शनिवारी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सावंतवाडी शाखेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची मासिक शनिवारी पर्णकुटी विश्रामगृह सावंतवाडी येथे पार पडली. यावेळी सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सावंतवाडी शाखेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा दिन’ कार्यक्रम साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. दरम्यान, श्री. मस्के यांनी 36 वर्ष जिल्हा बँकेत सेवा बजावल्यानंतर नुकतेच ते सेवानिवृत्ती झाले. या निमित्ताने त्यांच्या पुढील आयुष्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे शुभेच्छा दिल्या. यावेळी कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, आनंद वैद्य, सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष अँड. संतोष सावंत, प्रा. सुभाष गोवेकर, उषा परब, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, अँड. अरूण पणदुरकर, भरत गावडे, अँड. नकुल पार्सेकर, प्रा.प्रतिभा चव्हाण, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, मंगल नाईक-जोशी, रामदास पारकर, विनायक गांवस आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

पाण्याचे संगोपन, संरक्षण, संवर्धन आणि अपव्यय हे आजच्या काळाची गरज बनली आहे…! संतोष कविटकर

news

पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्त करण्याचे शिवरायांचे होते ध्येय..! अँड शिवाजी देसाई यांचे अँड उदय भेंब्रे यांना प्रत्युत्तर.

news

ॐ त्रिमूर्ती स्वामी समर्थ मठ आकेरी हुमरस येथे ५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

प्रसाद परब

Leave a Comment