कुडाळ: आकेरी हुमरस, ता. कुडाळ येथील ॐ त्रिमूर्ती स्वामी समर्थ मठ येथे मठाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. १६ मार्च रोजी सकाळी ७.०० वाजता स्वामी समर्थ यांच्या पालखीची गावप्रदक्षिणा काढण्यात आली. गुरुवार दि. १९ मार्च २०२६ सकाळी ५.३० वा. अभिषेक, काकड आरती, नित्यपूजा, सकाळी ८ ते ११ वा. नामस्मरण व भजन, दुपारी १ ते १.३० वा. महानैवेद्य, महाआरती, दुपा. २ ते ३.३० वा. महाप्रसाद, सायकाळी ६ वा. सांजआरती करण्यात आली. त्यानंतर सायं. ७ वा. नवोदित बाल दशावतार नाट्यमंडळ, माड्याचीवाडी यांचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. शुक्रवार दि. २० मार्च २०२६ स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करण्यात आला. या दिवशी पहाटे ३ ते ४ वा. काकड आरती, सकाळी ५ ते ७ वा. महाअभिषेक, सका. ७ ते ८ वा. स्वामी चरित्र वाचन, सकाळी ८ ते १० वा. व्यासपूजा, सकाळी १० ते १२ वा. सेवा भजन, दुपा. १ ते १.३० वा. महानैवेद्य, महाआरती, दुपा. २ ते ३ महाप्रसाद, साये. ६ वा. पालखी मठप्रदक्षिणा, सायं. ७ वा. सांजआरती करण्यात आली. सायं. ७.३० वा. खास महिलांकरिता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच आकेरी गावचे प्रतिथयश तलाठी आदर्शमंडळ अधिकारी गुरुनाथ उर्फ (भाई गुरव) यांचा सत्कार समारंभ हि संपन्न झाला.

आज शनिवार दि. २९ मार्च २०२६ (वर्धापन दिन दिवस १ला) पहाटे ५ वा. अभिषेक, काकड आरती, नित्यपूजा, सकाळी ७ ते ८ वा. परिसरशुद्धी, सकाळी ८ ते १० वा. यजमानांची देहशुद्धी, देवतांना नारळ व विडे अर्पण, स्वामी मूर्ती अभिषेक, सकाळी १० ते ११ वा. स्वामी गुणगायन, सकाळी ११ ते १२ वा. इच्छुकांचे अभिषेक, दुपारी १ ते १.३० वा. महानैवेद्य, महाआरती, दुपा. १.३० ते ३.३० वा. महाप्रसाद, सायं. ४ ते ६.३० वा. संवादी सहचर संस्था, धारगळ, पेडणे, गोवा यांचा संगीत कार्यक्रम, सायं. ७ वा. आरती, सायं. ७.३० वा. सत्कार मूर्ती यांच्या सत्कारांचा कार्यक्रम, रात्रौ ८ वा. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी पहाटे ५.३० वा. काकड आरती, अभिषेक, नित्यपूजा, सकाळी ९ वा. पिठदेवता आवाहन, चैतन्यप्राप्ती याग, दुपा. १.३० ते २ वा. महानैवेद्य, महाआरती, दुपा. ३ ते ५ वा. महाप्रसाद, सायं. ६ वा. पालखी सोहळा, ७ वा. आरती, ७.३० वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा पौराणिक दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वा. नित्यपूजा, ब्राह्मणभोजन, समाराधना, सकाळी ८ वा. सत्यदत्त पूजा, दुपारी १ ते १.३० वा. महानैवेद्य, महाआरती, सायं. ५ ते ७ हुमरस गावातील नामवंत भजनी बुवा निलेश तेली आणि सहकलाकार यांचा भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ ते ७.३० वा. आरती, रात्री ८ वा. होणार आहे. त्यानंतर श्री. गुरुवर्य महेंद्र पिंगुळकर (निवजे) यांच्या मार्गदर्शनात जिल्हा स्तरीय निमंत्रीत भजन मंडळाची भजन स्पर्धासंपन्न होणार आहे.
ॐ त्रिमूर्ती स्वामी समर्थ मठ आकेरी हुमरसबाबत थोडक्यात माहिती..!
आकेरी हुमरस येथे हा मठ स्वामीभक्त श्री सिद्धेश कृष्णकांत घोगळे यांनी पाच वर्षापूर्वी सुरु केला आहे. सिद्धेश कृष्णकांत घोगळे एक प्रमुख आध्यात्मिक व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती आहेत. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आणि स्वामी समर्थ नामाची आवड व ध्यास आहे. येथे मठ सुरु केल्यानंतर याठिकाणी लोकांना आध्यत्मिक मार्गदर्शन करण्याचे काम सिद्धेश घोगळे करत आहेत. या मठात दर गुरुवारी दुपारी आणि रात्री स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येथे. असंख्य भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात. अनेक स्वामी भक्त येथे अन्नदानासाठी मदत करतात. श्री सिद्धेश घोगळे एक अध्यात्मिक गुरु आणि समाजसुधारक आहेत.

श्री सिद्धेश घोगळे ॐ त्रिमूर्ती स्वामी समर्थ मठात विविध समाजउपयोगी उपक्रम रबावतात. श्री सिद्धेश घोगळे यांच्या सानिध्यात आलेले अनेक तरुण दारू, गुटखा, तंबाखूचे सेवन बंद करून नशामुक्ती जीवन जगत असून आध्यत्मिक मार्ग स्विकारला आहे. तरुणांना सनातन धर्मानुसार योग्य पद्धतीने वागण्याची शिकवण श्री सिद्धेश घोगळे देत आहेत.स्वामी भक्त श्री सिद्धेश घोगळे या दर सोमवार ते बुधवार मठात आध्यत्मिक मार्गदर्शन करतात. यामध्ये प्रामुख्याने पूजा पाठ करणे, नामजप करणे आणि पूजा पाठ व नामजपाचे फायदे जीवनात कसे होतात? याबाबत योग्य मार्गदर्शन केले जाते. यामुळे अनेक लोकांची आध्यत्मिक प्रगती होते आणि जीवन सुखी होते.

या ठिकाणी येणारे अनेक स्वामी भक्त सांगतात कि, श्री सिद्धेश घोगळे यांच्या अचूक आध्यत्मिक मार्गदर्शनामुळे जीवनात अध्यात्मिक प्रगती होऊन जीवन सुखमय झाले आहे. श्री सिद्धेश घोगळे हे जेव्हा स्वामी चरणी गाराणे घालतात तेव्हा मन भरून येते. श्री सिद्धेश घोगळे यांच्या वाणीमध्येच शुद्धता आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलून, त्यांना भेटून आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन खूप चांगला अनुभव येतो. श्री सिद्धेश घोगळे यांना त्यांच्या आध्यत्मिक वाटचालीत त्यांच्या पत्नी सौ. सिद्धी घोगळे यांचा मोठा हातभार लागतो. श्री सिद्धेश घोगळे यांना त्यांचे वडील आध्यत्मिक मार्गात गुरु बनून सतत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. याच मठात येणारे कित्येक युवक आज व्यसन सोडून व्यसनमुक्त जीवन जगत आहेत. भविष्यात अनेक युकवकांना व्यसनापासून दूर ठेऊन त्यांना आध्यत्मिक प्रगती साधता यावी आणि उत्कृष्ट जीवन जगाता यावे यासाठी स्वामीभक्त श्री सिद्धेश प्रयत्नशिल आहेत. श्री सिद्धेश घोगळे यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
