स्टोरी

आमदार दिपक केसरकर यांनी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात प्रवेश घेऊ नये..! पूर्वेस सरनाईक.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: राज्यात आपण महायुती म्हणून एकत्र आहोत. मात्र महायुतीमध्ये कुठलेही आपापसात वाद असता कामा नये. आपण सर्व एक म्हणून आहोत. आणि सर्वत्र एक म्हणून राहायचे आहे. आपला पक्ष संघटना वाढवायचे आहेत. पण ही वाढवताना आपल्याच मित्र पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन आपण आपला पक्ष वाढवणे उचित नाही.  याबाबत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार पक्षाचे नेते दिपक केसरकर यांनी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात प्रवेश घेऊ नये. अशी जी भूमिका घेतली आहे त्याचे आम्ही युवा सेना स्वागत करत आहोत. खरं तर असं वागणं असायला हवा. आपण सर्व महायुतीचे एकत्र आहोत. मात्र आपला पक्ष वाढवण्यासाठी आपण विरोधी पक्षातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा शिवसेना या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना पक्षात प्रवेश द्या आणि पक्ष संघटना वाढवा. असे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेस सरनाईक यांनी बैठकीत स्पष्ट केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांनी जिल्ह्यातील युवा सेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली यावेळी महासचिव राहुल लोंढे सचिव किरण साळी राम राणे जिल्हाप्रमुख हर्षद ढेरे. अर्जित पोकळे. सोनाली पाटकर मेहुल धुमाळे प्रतीक सामंत आदी उपस्थित होते.

यावेळी श्री सरनाईक पुढे म्हणाले कॉमन मॅन दिन आता आम्ही युवा सेना सर्वत्र राज्यात कॉमन मॅन म्हणून काम करणार आहे आणि ते आमचं स्लोगन आहे. आम्ही आता कॉमन मॅन चा सन्मान करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ६३, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात ६५, कणकवली विधानसभा मतदारसंघात ६० अशा एकूण जवळपास १८० कॉमन मॅन चा येथे पंधरा दिवसात सत्कार सन्मान केला जाणार आहे. तसा उपक्रम आम्ही राबवणार आहोत. असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी युवा सेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे, सचिव किरण साळी, राम राणे, जिल्हाप्रमुख हर्षद ढेरे, जिल्हाप्रमुख प्रतीक सामंत हर्षद पारकर, युवती जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, सावंतवाडी शहर प्रमुख अर्चित पोकळे, श्री पोकळे प्रतीक बांदेकर, निखिल सावंत, श्री मेस्त्री, प्रीतम गावडे, राकेश सावंत, स्वप्निल गावडे, मेहुल धुमाळे आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

जिल्ह्यातील बेरोजगारांच वाटोळं करणाऱ्या केसरकरांनी एमपीएससी , युपीएससीच्या गोष्टी करू नयेत…! योगेश धुरी

news

गुडीपाडवा सणाचे महत्व आणि माहिती!

news

राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून असाधारण रजा हा शासन निर्णय बदलण्याची मागणी!

news

Leave a Comment