स्टोरी

नवीन वर्षाची सुरुवात “बँक खाते” ब्लॉक च्या मेसेजने…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सन २०२५ साल नववर्ष या नव्या वर्षाचे जंगी स्वागत सुरू असतानाच आणि सर्व जण नव्या वर्षाच्या जल्लोषात बेधुंद होऊन एकमेकांना शुभेच्छा चा वर्षाव करत असतानाच अचानकपणे अनेकांची बँकेची खाती ब्लॉक झाल्याच्या मेसेज धडकतो आणि सगळ्यांची तारांबळ उडते तेव्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्टेट बँकेच्या अनेक खातेदारांची बँक खाते नव्या वर्षाच्या शुभमुहूर्तालाच गोठवण्यात आली आहेत ब्लॉक करण्यात आली आहेत. जवळपास हजारो बँक खाते गोठवण्यात आले आहेत स्टेट बँकेकडे आज अनेकांनी धावही घेतली बँक खातेदारांची खाते गोठवण्यात आल्यामुळे एकच तारांबळ उडाली होती. नेमकी बँक खाते का गोठवण्यात आली याबाबत अनेक जण संभ्रमा अवस्थेत आहेत. सावंतवाडी स्टेट बँकेतील जवळपास दीड हजार जणांची बँक खाते अचानक ब्लॉक झाली आहेत. भारतीय रिझर्व बँकेने बँक खातेदारांची कॅटेगिरी केली असून. त्यामध्ये रिक्स कॅटेगरी मधील अनेक ग्राहकांची बँक खाते गोठवण्यात आल्याचे सांगण्यात आले ज्या बँक खातेदारांची केवायसी झाली नाही अशांची सर्व खाती ब्लॉक झाली आहेत त्यामुळे अनेकांना नव्या वर्षात ऑनलाईन ट्रांजेक्शन व्यवहार करताना अडचणीला सामोरे जावे लागले आहे. बँक खाते अचानक गोठवण्यात आल्याने ग्राहक चिंता दूर झाले आहेत. सावंतवाडी बँकेचे शाखाधिकारी पराग जाधव यांनी स्पष्ट केले भारतीय रिझर्व बँकेच्या माध्यमातून ही बँक खाते ब्लॉक करण्यात आली आहेत भारतीय रिझर्व बँकेच्या नियमावलीनुसार दरवर्षी सदर बँकेच्या खात्यांची केवायसी खातेदाराने करणे आवश्यक आहे 31 डिसेंबर पर्यंत बँक खाती केवायसी करणे आवश्यक आहे त्याबाबत सदर खातेदारांना गेल्या दोन महिन्यापासून एकदा नव्ह दोनदा नवे. तीन वेळा मेसेज पाठवण्यात आले होते मात्र अनेक खातेदाराने त्याकडे दुर्लक्ष केला आता एक जानेवारीला थेट भारतीय रिझर्व बँकेच्या माध्यमातूनच बँक खात्यांची कॅटेगिरी करून खाती गोठवण्यात आली आहेत. मात्र ग्राहकाने घाबरून जाऊ नये बँकेकडे येऊन आपला केवायसी अर्ज भरून दिल्यानंतर तात्काळ बँक खाते पुन्हा सुरू करण्यात येत आहेत सावंतवाडी शाखेमध्ये जवळपास लाख-हून अधिक ग्राहक खातेदार आहेत मात्र त्यातील 1465 खातेदारांची खाती गोठवण्यात आल्याचे ऑनलाइन दिसत आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. आज सकाळी नववर्षाच्या शुभेच्छा आणि त्यात करून मोबाईलवर ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी अनेक खातेदार यांनी प्रयत्न केला परंतु त्यांची ऑनलाइन प्रक्रियाच बंद झाली होती त्यामुळे बँक खाते आपले ब्लॉक झाले आहे असे काही ग्राहकांना मेसेज आला परंतु काही जणांना मेसेज गेला नाही त्यामुळे अनेक ग्राहकाने स्टेट बँकेच्या शाखेकडे धाव घेतली होती. सेवानिवृत्त बँक अधिकारी रवींद्र ओगले यांचे बँक खाते गोठवण्यात आल्याने त्यांची तारांबळ उडाली त्यांनी बँकेकडे धाव घेतल्यानंतर सदर केवायसी त्यांचे झाले नसल्यामुळे बँक खाते रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले मात्र त्यांनी केवायसी केल्यानंतर त्यांचे बँक खाते सुरू ची प्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले. श्री ओगले यांनी स्पष्ट केले भारतीय रिझर्व बँकेने थेट बँक खाते गोठवण्यापूर्वी संबंधित ग्राहकांना त्याची कल्पना देणे आवश्यक आहे पण अनेकांचे बँक व्यवहार आता ऑनलाईन होत आहेत त्यामुळे ग्राहकांची त्यातून तारांबळ होऊ शकते त्यामुळे वरिष्ठ स्तरावर याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले मात्र आज नव्या वर्षाच्या प्रारंभीच अनेक बँकांची खाती केवायसी मुळे ब्लॉग झाल्यामुळे अनेकांची त्रिधापीठ उडाली होती..


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचा उपद्रव थांबविण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी उपाययोजना कराव्यात! वनमंत्री सुधीर मुनगंटीवार….

news

दोन निराधार वयोवृद्ध महिलांना सामाजिक बांधिलकीची मदत !

news

गड-दुर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार ! – मा. श्री. मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री*

news

Leave a Comment