स्टोरी

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सिंधुदुर्ग या संस्थेचा चौथा वर्धापन दिन निमित्ताने यावेळी विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये पत्रकार, डॉक्टर, वकील, उद्योजक, महिला बचत गट, विविध स्पर्धा वकृत्व, शिवगर्जना स्पर्धा, पोवाडा वेशभूषा, आधीचा शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्येसंवाद तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड संतोष सावंत,तरुण भारतचे क्राईम रिपोर्टर उमेश सावंत, युवा उद्योजक डॉक्टर राजेश माने, युवा उद्योजक शैलेश लाड, आदर्श शिक्षक वैभवी राय शिरोडकर, आदर्श शिक्षिका सायली लांबर, समाजसेवक पुरस्कार डॉ रमाकांत गावडे, समाजसेवक पुरस्कार ॲड बाबा खाजा, आदर्श पत्रकार संजय भाई, श्रिया माणगावकर यांचा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते उद्योजक नारायण सावंत, प्रतिष्ठांचे जिल्हाध्यक्ष संतोष लळवणेकर, शिवा गावडे, केशव जाधव, संदीप चांदेकर, अंकिता माळकर, पूजा गावडे, मंगेश माणगावकर, कल्याण कदम, ज्ञानेश्वर पारधी, सेजल पेडणेकर, संगीता पारधी, युवा उद्योजक सत्यम सावंत, धीरज सावंत आधी उपस्थित होते.

यावेळी आदर्श पत्रकार पुरस्कार यावर्षीचा ॲड संतोष सावंत यांना देण्यात आला. त्यांनी पत्रकारितेला सन १९९३ पासून पत्रकारितेला सुरुवात दैनिक सकाळ या वृत्तपत्रात सन १९९७ पर्यंत कलंबिस्त बातमीदार म्हणून काम केले, त्यानंतर १९९७ पासून १९९८ या दोन वर्षाच्या कालावधीत दैनिक पुढारी या वृत्तपत्रात सावंतवाडी प्रतिनिधी काम केले. त्यानंतर दैनिक रत्नागिरी एक्सप्रेस १९९८ या एक वर्षाच्या कालावधीत सावंतवाडी तालुका प्रमुख म्हणून काम केले. त्यानंतर १९९९ ते २०२६ अशी गेली २६ वर्ष तरुण भारत सावंतवाडी प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. वृत्तपत्रात गेली ३३ वर्ष पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. बीकॉम व बीए पदवी शिक्षण, एलएलबी, पत्रकारिता पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. कारगिल युद्ध, पर्यावरण, राजकीय सामाजिक, कृषी अशा सर्व स्तरावरील विशेष लेख, गोरगरीब सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे. सामाजिक सहकार साहित्यिक अशा विविध क्षेत्रात काम, साहित्य क्षेत्रात कोकण मराठी साहित्य परिषदचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष म्हणून तीन वर्ष काम केले आणि आता जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा आठ वर्ष खजिनदार म्हणून कार्यरत, कलंबिस्त पंचकोशी दुग्ध व्यवसायिक संस्थेचा चेअरमन, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक, सह्याद्री फाउंडेशन चे माजी सचिव, कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाचे संस्थापक, सचिव अशा विविध क्षेत्रात काम आणि कार्यरत, सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत लढत राहणेआणि त्यांना न्याय मिळवून देणे. याच ध्येय्यामुळे त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात दिला आहे. तसेच अनेक युवकांना मार्गदर्शक ठरले आहेत.

तसेच संवाद तरुण भारत चे क्राईम रिपोर्टर उमेश सावंत हे क्राईम रिपोर्टर म्हणून गेली दहा वर्षांमध्ये काम करत आहेत. पेपर एजंटे ते पत्रकार म्हणून काम करत आहेत. संजय भाईप यांचाही आदर्श पत्रकार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनीही गेली दहा वर्ष हुन अधिक काळ ते पत्रकारितेत कार्यरत आहेत. आदर्श कलाकार निर्माता दिग्दर्शक गणेश प्रसाद गवस यांचाही सत्कार करण्यात आला. श्रिया माणगावकर यांनी तब्बल वीस भाषांमध्ये १५०० गायकांचे विश्वविक्रमी संविधान महागायन मध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आधारचा समाजसेवक म्हणून डॉक्टर रमाकांत गावडे हे उत्तम प्राध्यापक तसेच समाजसेवेमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. बाबा खाजा हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात आला.

वकृत्व स्पर्धा सार्थक वालावलकर, अभिराज सावंत, शिवगर्जना स्पर्धा रितेश परब, पोवाडा दिव्याज्ञ पंडित, वेशभूषा अनुप्रिता राणे, वेशभूषा सविता वडार, वेशभूषा अंगणवाडी देवांश प्रभू, चित्रकला स्पर्धा समृद्धी गावडे, बचत गट एकता महिला बचत गट कारिवडे, प्रगती बचत गट कारिवडे, श्री देव जैन ब्राह्मण महिला बचत गट मळगाव, समता महिला बचत गट कारीवडे आधी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व आदर्श व्यक्ती यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविकामध्ये जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी स्पष्ट केले. राजे प्रतिष्ठान कामगार सेना ही सामाजिक भावनेतून काम करत आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेषता सावंतवाडी तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्या कधीही समाजासमोर त्यांचे कार्य आले नाही. आम्ही त्यांचा एक सन्मान करून समाजाला एक प्रेरणादायी काम करत आहोत. असे ते म्हणाले. यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ते म्हणाले ही संस्था येथे चार वर्ष आदर्श व तसे काम करत आहे. समाजाला प्रेरणा देण्याचे काम केले जात आहे यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले महिला बचत गटांचा सन्मान केला गेला. ही बाब उल्लेखनीय आहे. विशेषता पत्रकार, डॉक्टर, वकील तसेच उद्योजक अशा मान्य व्यक्तींचा आणि ती आदर्श व्यक्ती आहेत. योग्य व्यक्तींचा येथे सन्मान झाला आहे. खर तर महिला बचत गट स्थापन आणि निर्मिती ही माझी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केली. परंतु आज महिला बचत गटांना म्हणावे तसे व्यासपीठ मिळत नाही. आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर का मोठे उद्योग व्यवसाय आले असते तर खऱ्या अर्थाने या बचत गटाच्या निर्मितीचे फलित झाले असते. असे ते म्हणाले.

या मंडळाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत, मंगेश माणगावकर यांनीही शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमाकांत गावडे, आभार कल्याण कदम यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच महिला बचत गटाच्या सदस्य उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांचा खास गौरव आणि त्यांच्या कार्याचे कौतुक महिला बचत गट यांनी केले. त्यांचा आज जन्मदिवस असल्याने वाढदिवसही साजरा करण्यात आला.


Spread the love

Related posts

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेल्या कामाबाबत रायगड पत्रकारांनी आज क्रांतिदिनी केले बोंबाबोंब आंदोलन!

news

सिंधुदुर्ग जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन बोगस..! योगेश धुरी 

news

परसबाग निर्मिती उपक्रमात केंद्रशाळा आरे – देवीचीवाडी शाळा द्वितीय

news

Leave a Comment