स्टोरी

हायस्कूलसाठी चार वर्ग खोल्या बांधुन देणार! शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत.

Spread the love

मसूरे प्रतिनिधी: पोईप एज्युकेशन सोसायटी संचलित सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरणचे वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक श्री दत्ता सामंत, प्रयोगशाळा देणगीदार आर डी परब, उद्योजक सुरेश नेरुरकर, पोईप संस्थेचे उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, पोईप सरपंच श्रीधर नाईक, सनदी लेखापाल सुहास पालव, संस्था सचिव विलास माधव, संस्था संचालक महेंद्र पालव,महेश पालव, सत्यवान पालव,कमलेश प्रभू, विश्वनाथ पालव, नामदेव पुजारे,माजी नगरसेवक दिपक पाटकर,संजय माधव, अरूण भोगले, पोईप पोलिस पाटील अविनाश जाधव, बाबुराव चिरमुले, अरूण मेस्त्री, डॉ हर्षल परब, डॉ सुनिल परब, डॉ अस्मिता परब, मुख्याध्यापक विकास कुंभार,हेदुळ सरपंच प्रतिक्षा पांचाळ,वायगवडे सरपंच विशाखा सकपाळ,व पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते

यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले की जिल्ह्यातील काही मोजक्या शाळांमध्ये पोईप हायस्कूलचे नाव असून पोईप हायस्कूलचे संस्था संचालक सर्व शिक्षक यांनी पोईप हायस्कूलच्या यशात नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे. पोईप हायस्कूलचे विद्यार्थी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यांमध्ये नावारुपास येत आहेत याबद्दल आपण संस्था सर्व शिक्षक विद्यार्थी यांचे अभिनंदन करतो. मागिल कित्येक वर्षांपासून पोईप हायस्कूल इमारत वर्ग खोल्यासाठी संस्था व ग्रामस्थांनी आपल्याकडे वेळोवेळी मागणी केली होती. मात्र शासकीय निधी उपलब्ध होत नसल्यामुळे आपण खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून इमारतीसाठी चार वर्ग खोल्या बांधून देणार असुन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या चार वर्ग खोल्याचे भुमिपुजन करण्यात येणार आहे. यापुढेसुद्धा पोईप हायस्कूलसाठी सहकार्य करु असे दत्ता सामंत यांनी सांगितले.

सनदी लेखापाल सुहास पालव म्हणाले, 1962 सांली पोईप हायस्कूल सुरू झाले असून जवळपास 60 वर्षे इमारत बांधकामाला झाली आहे. सदर इमारत जिर्ण झाली असुन इमारतीचे नूतनीकरण होणे अत्यावश्यक आहे. यासाठी आपण स्वतः व सुरेश नेरुरकर मिळुन दोन वर्ग खोल्या बांधून हायस्कूलसाठी देणार आहोत. तसेच या प्रशालेत शिक्षण घेवुन विविध पदावर व व्यवसात कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी या पुढे माजी विद्यार्थी संघ स्थापन करून विद्यार्थी एकत्रित होऊन निधी संकलन करून शाळेसाठी आर्थिक मदतीचे योगदान दिल्यास शाळा सुसज्ज होण्यस मदत होईल. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यानी आपण प्रशालेचे काही देणे लागत असुन जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी प्रशालेला आपल्या परिने सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी पोईप संस्था व हायस्कूल यांच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रशालेतील इयत्ता 5वी 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक व क्रीडा विभागात उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन सौ केतकी सावंत, प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री विकास कुंभार, आभार कांराडे यांनी मानले.


Spread the love

Related posts

कोकण रेल्वे सावंतवाडी स्थानकाच्या‌ सुशोभीकरणाचे ९ ऑगस्ट रोजी उध्दघाटन सोहळा 

news

घराचे छप्पर कोसळलेल्या बांदीवडेतील मांजरेकर कुटूंबियांची आ. वैभव नाईक यांनी भेट घेत केली आर्थिक मदत

news

कल्याण पूर्वेतील ‘यु टाईप’ रस्त्याच्या रुंदीकरणाबाबतच्या सुनावणीला हजर रहाण्याचे महापालिकेने केले जाहिर फलकाद्वारे आवाहन!

news

Leave a Comment