स्टोरी

कलंबिस्त येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दशावतार नाट्य महोत्सवाचे उद्घाटन…..

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी : कलंबिस्त गावात सातत्याने गेली अकरा वर्ष दशावतार नाट्य महोत्सव घेऊन हनुमान दशावतार नाट्यमंडळ दशावतार लोककला जिवंत ठेवण्याचे काम करीत आहे. या मंडळाच्या माध्यमातून अनेक कलाकार निर्माण झाले आहेत. हे कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागात सातत्याने एखादा महोत्सव भरविणे आणि तो यशस्वी करणे ही खरी समाजसेवा आहे. असे मत सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ यांनी प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून बोलताना स्पष्ट केले. कलंबिस्त हनुमान दशावतार नाट्य मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने १६ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत महाशिवरात्रोत्सवानिमित्त कलंबिस्त श्री लिंगेश्वर मंदिरात दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सैनिक पतसंस्था चेअरमन बाबुराव कविटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सैनिक चंद्रकांत शिरसाठ, सुभाष सावंत बाळकृष्ण देसाई, माजी सरपंच शरद नाईक, गावकर अनिल सावंत ,देवकर विष्णू सावंत ,भाई देसाई ,रमेश सावंत ,बाबू बिडये ,धोंडी सावंत ,विश्वजीत सावंत सखाराम सावंत, आनंत सावंत, अंतोन रोड्रिक्स, राजेश पास्ते ,कृष्णा सावंत,अजित कदम,चंदू राजगे ,भाई सावंत ,सुनील सावंत, नप्रल्हाद तावडे आणि मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. सुनिल राऊळ म्हणाले गेली अकरा वर्ष हनुमान दशावता नाट्य मंडळ हा नाट्यमहोत्सव घेऊन दशावतार ही लोक कला जोपासण्याचे काम करत आहे. कविटकर म्हणाले रामभाऊ सावंत यांनी सुरू केलेले हे हनुमान दशावतात नाट्य मंडळ या मंडळातून अनेक दशावतार कलाकार घडले त्यांचं कार्य आजही पुढे नेण्याचं काम मंडळाचे अध्यक्ष सखाराम सावंत व त्यांचे सहकारी करत आहेत. हे कौतुकास्पद आहे. असेच दरवर्षी दशावतार महोत्सव व्हावेत, आमच्याकडून जे काय सहकार्य करता येईल ते नक्की करू. असे त्यांनी स्पष्ट केले. फोटोमध्ये कलंबिस्त दशावतार नाट्य महोत्सवात सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर यांचा सत्कार करताना सखाराम उर्फ तात्या सावंत, बाजूला सुनील राऊळ, चंद्रकांत शिरसाट, सुभाष सावंत, प्रल्हाद तावडे, रमेश सावंत, शरद नाईक आणि अनंत सावंत आधी.


Spread the love

Related posts

विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देणेस शिशु विकास मंदिर कटीबध्द – महेश इंगळे 

news

सचिव वरूण सरदेसाई यांनी आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी दिली भेट.

news

आकाशी चंद्र चांदण्याची साक्ष देत कोमसाप कवी संमेलन बहरलं.

news

Leave a Comment