स्टोरी

कुमारी सार्जंट स्वरांगी संदीप खानोलकर व तिचे प्रशिक्षक फर्स्ट ऑफिसर गोपाळ भिवा गवस यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणगौरव…!

Spread the love

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग नगरी जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग पोलीस परेड ग्राउंड वर पार पडलेल्या जिल्हास्तरीय मुख्य गणतंत्र दिवस सोहळा पार पडला. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रविंद्रजी चव्हाण यांनी ध्वजारोहण केले. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविलेल्या विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला.

गुणवंतांचा गुणगौरव करतांना पालकमंत्री श्री रविंद्रजी चव्हाण

 

यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने गेल्या वर्षी मुख्य गणतंत्र दिवस शिबिरामध्ये सहभागी झालेली कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी विद्यार्थिनी कुमारी सार्जंट स्वरांगी संदीप खानोलकर व तिचे प्रशिक्षक फर्स्ट ऑफिसर गोपाळ भिवा गवस यांचा गुणगौरव करण्यात आला. यापूर्वी स्वरांगीच्या बहुमोल कामगिरीबद्दल विविध संस्थांकडून तिचा गुणगौरव सोहळा पार पडला होता.

एन. सी. सी. प्रशिक्षक फर्स्ट ऑफिसर गोपाळ भिवा गवस
कुमारी सार्जंट स्वरांगी संदीप खानोलकर

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्याचे दिल्ली दरबारी माध्यमिक विभागातून प्रतिनिधित्व करणारी स्वरांगी संदीप खानोलकर ही पहिलीच विद्यार्थिनी होती. खडतर मेहनत आणि कष्टाच्या जोरावर तिने हे यश मिळवले यामध्ये कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य एन.पी. मानकर तसेच विद्यालयाचे असोसिएट एन.सी.सी. ऑफिसर गोपाळ गवस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


Spread the love

Related posts

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे २३ मार्च रोजी साडेतीन शक्तीपीठ दर्शन सोहळा! प.पु. जगतगुरु शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांची प्रमुख उपस्थिती.

news

दूहेरी खूनातील आरोपीला जामीन मंजुर!

news

दादर येथे सिद्धिविनायकाच्‍या ऑनलाईन दर्शनाच्‍या नावाखाली पैसे उकळणारा अटकेत !

news

Leave a Comment