स्टोरी

जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्र वेंगुर्ला वतीने “समाज प्रबोधन महोत्सवाचे” आयोजन…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्र वेंगुर्ला वतीने सदगुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी निमित्त उद्या रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी समाज प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव आनंदी मंगल कार्यालय, कट्टा कॉर्नर, बांदा, तालुका सावंतवाडी येथे सायंकाळी ६ :०० वा. ते ८:०० वा. या दरम्यान संपन्न होणार आहे. या महोत्सवात उपासना यज्ञ, हरिपाठ, संगीत जीवन विद्या आणि प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात सदगुरु श्री वामनराव पै यांचे सतशिष्य निवृत्त डेप्युटी चीफ इंजिनियर शिवाजीराव पालव उपस्थितांना प्रबोधन करणार आहेत. मनुष्याला आजच्या ताण-तणावाच्या जीवनात योग्य आहार, शुद्ध पाणी, शुद्ध हवा याचबरोबर योग्य विचारांची गरज आहे. यासाठीच सदगुरु श्री वामनराव पै यांचे विचार समाजात पोहचवण्याचे अनमोल कार्य सदगुरु श्री वामनराव पै यांचे शिष्य करत आहेत. आज एकविसाव्या शतकात मोबाईल, इंटरनेट च्या काळात आजची काही तरुण पिढी भरकटत चालली आहे. आजची काही तरुण पिढी अयोग्य आणि चुकीच्या मार्गदर्शना मुळे जीवनात चुकूच्या मार्गाने वाटचाल करत अनेक चुकुची कामं करत आहे. आजची काही तरुण पिढी दारू, सिगारेट, गुटखा ड्रग च्या आहारी जाऊन स्वतःचे जीवन उध्वस्त करत आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे चांगल्या विचारांचा अभाव आणि वाईट संगत होय. अशा वेळी सदगुरु श्री वामनराव पै यांचे जीवन विद्या मिशन मध्ये सहभागी होऊन सदगुरु श्री वामनराव पै लिखित अनमोल विचारांचे वाचन करणे आणि पालन करणे ही काळाची गरज आहे.

सदगुरु श्री वामनराव पै यांनी लिहिलेल्या “तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार ” या आणि अनमोल ग्रंथाचे वाचन आणि सदगुरु श्री वामनराव पै लिखित ग्रथांचे वाचन करून त्यानुसार आचरण करून आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊन आपले जीवन उत्कृष्ट पणे जगत आहेत.

” हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे…!”  या विश्वप्रार्थनेच्याद्वारे सदगुरु श्री वामनराव पै यांनी जगाला विश्वशांतीचा संदेश देत सर्व जग सुखी होण्याचा जणू काय एक मार्गच मोकळा करून दिला आहे. सदगुरु श्री वामनराव पै यांचे हेच विचार आणि विश्वप्रार्थना आणि सदगुरुंचे संदेश आजच्या पिढीला देण्याचे अनमोल कार्य त्यांचे शिष्य करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्या रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी समाज प्रबोधन महोत्सवाचे आयोजन आनंदी मंगल कार्यालय, कट्टा कॉर्नर, बांदा, तालुका सावंतवाडी येथे सायंकाळी ६ :०० वा. ते ८:०० वा. या दरम्यान करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या प्रबोधन महोत्सवात सहभागी होऊन पुण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सदगुरुंच्या शिष्यांनी केले आहे.

प्रबोधन महोत्सवात सहभागी होण्यासाठी संपर्क :

विश्राम संभाजी पालव – ९४२२०६५१४५,

प्रकाश नाईक  – ९४०४४०४५५८

राजन डेगवेकर –  ९४०३१८८५०९

डॉ. निलेश अटक – ९०२१८२९०८२


Spread the love

Related posts

करौली बाबा यांच्या आश्रमातच मिळतात सर्व सुविधा! एटीएम मशीनपासून ते कँटिन, आईसक्रीम पार्लर, हॉटेल आणि फ्लाईट बुकिंग करण्याचे काऊंटरही आश्रमात उपलब्ध.

news

ओटवणेचा रोहित वरेकर आर्ट स्कॉलरशिपसह पुरस्काराने सन्मानित….!

news

कोकण पदवीधर मतदार यादीत आतापर्यंत १५,१५४ मतदारांची नोंदणी. ९ डिसेंबर पर्यंत नवीन नोंदणी करण्यास संधी. जिल्हाधिकारी किशोर तावडे

news

Leave a Comment