स्टोरी

कलंबिस्त येथील लिंगेश्वर मंदिरात राम जन्म सोहळा उत्साहाचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र आज रामनवमी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. कलंबिस्त येथील लिंगेश्वर मंदिरात राम जन्म सोहळा उत्साहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज येथील लिंगेश्वर मंदिरात राम जन्मावर भटजी कीर्तनकार श्री भागवत यांनी बहारदार पद्धतीने तब्बल दीड तास कीर्तन सादर करून जय श्रीराम चा गजर आळवला. सह्याद्री पट्ट्यात कलंबिस्त, सांगेली या भागात ग्रामदैवत येथे श्री राम जन्मोत्सव साजरा केला जातो. सकाळी पूजाअर्चा केल्यानंतर दुपारी बारा वाजता कीर्तन सोहळा करण्यात आला. या कीर्तन सोहळ्याला गर्दी झाली होती. त्यानंतर विधिवत राम जन्म सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर सुंठ प्रसाद देऊन व दुपारी महाप्रसाद तसेच सायंकाळी भजन व रात्री हनुमान दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. राम जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते सर्वांच्या तोडी जय श्रीराम चा गजर होता.


Spread the love

Related posts

श्री गणेशमूर्ती स्थापना १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीच करा ! – ‘दाते पंचांग’कर्ते मोहन दाते

news

आचिर्णे येथे श्री रासाईदेवी यात्रोत्सव २५ जानेवारी रोजी होणार…! विविध कार्यक्रमांचे आयोजन.

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तयार करण्याचे आपले स्वप्न आहे…! सत्यवान रेडकर

news

Leave a Comment